आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीपेक्षा BF वर करू लागली होती जास्त प्रेम, प्रियकराला म्हणाली-मला मारून तुही मरून जा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडोदरा - आनंदबाग सोसाइटी येथील विवाहितेने केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. पोलिस तपासात समोर आले की, कुंजलची हत्या तिचा प्रेमी मीत गोराना (पंचाल) यानेच केली होती. विवाहित प्रेयसीचे अविवाहित प्रियकराशी असलेले संबंध समाज स्वीकारू शकणार नाही हे लक्षात आल्यानंतर प्रेयसी कुंजलनेच प्रियकर मीतला मला मारून तूही मरून जा.. असे म्हटले होते.. त्यानंतर मीतने सुसाइड नोट लिहून प्रेयसीची हत्या केली होती आणि दुपारी 1.38 वाजता रेल्वेखाली आत्महत्या केली होती. 


वहिणीचा चुलत भाऊ 
पोलिसांनी मृत कुंजलच्या सासरी आणि माहेरच्या 40 पेक्षा जास्त सदस्यांना विचारणा करून अशा प्रकारचा कोणी वयक्ती आहे का याबाबत विचारले होते. पण काहीही माहिती मिळाली नाही. पण रेल्वेखाली आत्महत्या केलेल्या मीतकडून मिळालेल्या सुसाइड नोटमधून सर्वकाही स्पष्ट झाले. मीत हा कुंजलचा भाऊ हरीशची पत्नी खुशबू हिचा चुलत भाऊ होता. 

 

8 महिन्यांपासून होते प्रेमसंबंध 
क्राइम ब्रँचने कुंजलचे कॉल डिटेल्स मिळवले आहेत. त्यात मीत नावाच्या तरुणाबरोबर कुंजल सर्वात जास्त बोलत असल्याचे स्पष्ट झाले होते. याच शंकेनंतर पोलिसांनी 15 तासांमध्ये या हत्येचा संपूर्ण तपास पूर्ण केला. मीत आणि कुंजलमध्ये जवळपास 8 महिन्यांपासून संबंध होते. 

बातम्या आणखी आहेत...