आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: प्रेग्नंट पत्नीवर पतीनेच घडवला पाशवी गँगरेप, या अवस्थेत आढळली होती डेडबॉडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इलाहाबाद/कौशांबी - 5 जुलै 2017 रोजी झालेल्या हिना तलरेजा हत्याकांडाचा पोलिसांनी खुलासा केला होता. पोलिसांनी दावा केला होता की, हिनाच्या ब्लॅकमेलिंगमुळे कंटाळून पती अदनान खानने आपल्या 2 साथीदारांसह मिळून तिचा खून केला होता. यानंतर मृतदेह कौशांबी जिल्ह्यात हायवेजवळ शेतात फेकला होता आणि मित्रांसह मुंबईला पळून गेला होता. खुनानंतर 4 महिने झाल्यावरही दोनच आरोपींना अटक होऊ शकली आहे. तिसरा आरोपी अजून फरार आहे. DivyaMarathi.Com क्राइम सिरीजमध्ये तुम्हाला हिना तलरेजा मर्डर केसचे पूर्ण घटनाक्रम सांगत आहे.

 

दारू पिण्यासाठी कुठेही जायला तयार व्हायची हिना
- मीरपूरची रहिवासी हिना तलरेजा एका हुक्का बारमध्ये काम करत होती. तेथील संचालिकेने पोलिसांना सांगितले की, "स्वत:ला पर्सनॅलिटी मेकर म्हणावणाऱ्या हिनाची अलाहाबादच्या अनेक बारमध्ये ऊठबस होती. तिला दारूचे व्यसनच लागले होते. दारू पिण्याचे आमंत्रण मिळाल्यावर ती कोणत्याही वेळी, कुठेही जाण्यासाठी तयार व्हायची.''
- हिनाच्या फ्रेंड सर्कलमध्ये शहरातील श्रीमंत सामील होते. सन 2015 मध्ये तिची भेट अलाहाबादच्या अदनान खानशी झाली. दोघांमध्ये दाट मैत्री झाली आणि मग प्रेमसंबंध जुळले.
- दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नासाठी हिनाने आपला धर्म बदलला आणि तलरेजाची खान बनली.
- यामुळे हिनाची आई नीलिमा तलरेजा यांनी तिच्याशी नाते तोडले होते.

 

दुसऱ्या लग्नामुळे होती नाराज

- पोलिस म्हणाले की, हिनाशी लग्न केल्यानंतर इलाहाबादच्या शाहगंज परिसरात राहणाऱ्या अदनान खानने दुसरे लग्न केले होते. कारण त्याचे कुटुंबीय पहिल्या लग्नामुळे खुश नव्हते.
- दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच हिनाने अदनानविरुद्ध कोहना चौकीत अर्ज दिला होता. यानंतर अदनानने तिची माफीही मागितली होती.
- एसपी कौशांबी अशोक कुमार पांडे म्हणाले होते, अदनानने दुसरे लग्न केले होते, यामुळे हिनाशी त्याचे संबंध खराब झाले होते. अदनानच्या मते, हिना तिला ब्लॅकमेल करत होती, यामुळे तो त्रस्त झाला होता. यामुळेच त्याने आपल्या 2 साथीदारांसह मिळून तिचा खून केला होता.

 

आईनेही सोडली साथ
- कौशांबी डिस्ट्रिक्टचे सिराथू सर्कलचे सीओ अंशुमान तिवारी म्हणाले की, हिना तलरेजा हत्याकांडात आतापर्यंत दोन जणांना अटक झाली आहे. तिचा पतनी आणि त्याचा साथीदार कौशांबी जिल्हा कारागृहात आहेत. चार्जशीट दाखल झालेली आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. अजूनपर्यंत कुणालाही जामीन मिळालेला नाही. पोलिसांनी आरोपींविरुद्ध पुरावे गोळा केले आहेत.
- आई नीलिमा तलरेजा म्हणाल्या, "मला मुलीशी काहीही देणे-घेणे नाही. ती मरण्याआधीही मला खोटे बोलून घराबाहेर गेली होती. मी कोणतीही एफआयआर दाखल केली नव्हती. पोलिसांनी स्वत:हूनच प्रतिवादी बनून केस दाखल केली. मला यावर काहीही बोलायचे नाही. ती मेल्यानंतरही मला त्रासच देत आहे."

 

पुढच्या स्लाइड्सवर, इन्फोग्राफिकमध्ये पाहा, काय-काय झाले होते त्या रात्री 

 

बातम्या आणखी आहेत...