Home | National | Delhi | Murder mystery solve after three years

गर्लफ्रेंडसोबत जवळीक वाढल्याने भाच्याचा खून करून बालकनीत पुरले, 3 वर्षानंतर आरोपीला अटक...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 12:03 AM IST

पुरावे लपवण्यासाठी मातीत झाले लावले.

 • Murder mystery solve after three years

  नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांनी 3 वर्षानंतर एका घटनेचा खुलासा केला. दिल्लीत राहणाऱ्या एका व्यक्तीने 3 वर्षांपूर्वी आपल्याच भच्याचा खून केला होता. आता पोलिसांनी तीन वर्षानंतर आरोपीला हैदराबादमधून अटक केले.

  दिल्लीत एका व्यक्तीने आपल्या भाच्याचा निघृणपणे खून केल्याच्या खटनेचा 3 वर्षानंतर उलगडा झाला आहे. त्याने खून या कारणामुळे केला कारण त्याला संशय होता की, भाच्याचे एका मुलीसोबत अफेअर आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपीला 3 वर्षानंतर हैदराबादमधून अटक केले. ओडीसाचा बिजय कुमार महाराणा याची गर्लफ्रेंड दिल्लीत होती त्यामुळे तोही 2012 मध्ये दिल्लीत येऊन राहु लागला.


  2015 मध्ये बिजयचा भाच्चा जय प्रकाशदेखील हैदराबादवरून दिल्लीत आला आणि दोघे द्वारका परिसरात फ्लॅट करून राहु लागले. बिजय नोएडा सेक्टर 144 मध्ये एका आयटी कंपनीत काम करत होता तर जय प्रकाश गुरुग्रामच्या कंपनीत काम करता होता. काही दिवसानंतर जय प्रकाश आणि बिजयच्या गर्लफ्रेंडमध्ये जवळीक निर्णाम झाली. त्यामुळे बिजयने त्याच्या खूनाची प्लॅनिंग केली.


  6 फेब्रुवारी 2016 ला जय प्रकाश झोपेत होता तेव्हा बिजयने पंख्याच्या मोटारने त्याचा चेहचरा ठेचला आणि बॉडीला बालकनीत नेऊन जमीनीत गाढले. त्यानंतर पुरावे लपवण्यासाठी मातीत झाले लावले.


  एका आठवड्यानंतर त्याने आपल्या भावाची मिसींग रिपोर्ट दाखल केली. त्याने सांगितले की, तो मित्रांसोबत फिरायला गेला होता तेव्हापासून आलाच नाही. त्यानंतर आरोपी काही दिवस दिल्लीत राहिला आणि नंतर हैदराबालदा निघून गेला. मागच्या ऑक्टोबरमध्ये फ्लॅटच्या रिनोव्हेशनदरम्यान जय प्रकाशच्या शरीराचे सांगाडे मिळाले.


  पोलिसांनी फ्लॅटच्या मालकाला बिजयचा अॅड्रेस शोधण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने त्याचा शोध लावला आणि 26 डिेसेंबरला हैदराबादमधून आरोपी बिजयला अटक करण्यात आले.

Trending