आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालता-फिरता न येणाऱ्या सासुकडून एक चुक काय झाली, सुनेने घेतला जीव, आधी केली बेदम मारहाण, नंतर रॉकेल टाकून जिवंत जाळले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिलासपुर(छत्तीसगढ)- चालता-फिरता येत नसलेल्या सासुने बागेत लघवी केली म्हणून, सुनेने महिलेल्या जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. सिम्स रूग्णालयात उपचारादरम्यान महिलेची प्राणज्योत मावळली. जिल्हा न्यायालयाने न्यायाधीश योगिता विनय वासनिक यांच्या कोर्टात झालेल्या सुनावणीत आरोपी सुनेला अजिवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 


रतनपूर परिसरातील शीश गावात राहणारी आरोपी संगीता टिकले(22) वर्षे, पती सुरेंद्र आणि सासु बेदबाई पती हरिचरण(50) हे सगले घरात राहात होते. आरोपी महिलेची सासु काही दिवसांपासून आजारी होती, त्यामुळे त्यांना पायावर चालता येत नव्हते. 28 नोव्हेंबर 2017 संगीता टिकले घरी कामात व्यस्त होती. सासुल आराम करत होती तर पती कामावर गेला होता. दुपारी 1.30 वाजता त्या लघवी करायला उठल्या, पण तब्येत खराब असल्यामुळे त्या जास्ती चालू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी घरातील बागेतच लघवी केली.

 

काही वेळानंतर सुन संगिता बागेत गेली तेव्हा तिला लघवी केलेली दिसली. त्यानंतर शिव्या देत ती सासूकडे आली, आणि मारहाण करण सुरू केले. या मारहाणीत महिला बेशुद्ध झाली, त्यानंतर आरोपीने सासुवर रॉकेल टाकून पेटवून दिले. यात महिला 80-90 टक्के भाजली. काही वेळानंतर पती सुरेंद्र घरी आला आणि त्याने महिलेला रूग्णालयात भर्ती केले. त्यानंतर उपचारानंतर 3 डिसेंबर 2017 ला महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेच्या मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली, पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केले.
 

बातम्या आणखी आहेत...