आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिव्ही पाहून तीन तरुणांना सुचली कल्पना, आधी मित्र बनवले नंतर लालचेपोटी केली हत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठीही TV शोची मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - येथील 4 दिवसांपासून बेपत्ता असलेला दहावीचा विद्यार्थी राजू (17) चा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी रविवारी विहिरीजवळ जमीन खोदून मृतदेह ताब्यात घेतला. राजू बेपत्ता झाल्यानंतर काही वेळातच त्याच्यात 3 मित्रांनी त्याची हत्या केली होती. तिघांनी राजूच्या वडिलांकडून 50 लाखांची रक्कम उकळायची होती. पण आपलं पितळ उघडं पडण्याच्या भितीने त्यांनी राजूची हत्या केली आणि गड्डा तयार करून त्याला त्याठिकाणी पुरले. आरोपींना ही कल्पना टिव्हीवर क्राइम शो पाहून सुचली होती. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 


टीव्ही शो पाहून रचला कट 
पोलिसांनी सांगितले की, राजू बेपत्ता असल्याची तक्रार मिळाल्यानंतर त्याचा फोनही बंद होती. तपासादरम्यान समजले की राजू, अखेरचा कमल लोधी (24) बरोबर दिसला होता. पोलिसांनी शनिवारी त्याची चौकशी केली पण तो माहिती नसल्याचे सांगत राहिला. पण पोलिसांनी त्याला राजूबरोबर दिसल्याचे पुरावे असल्याचे सांगताच तो घाबरला आणि सर्वकाही सांगितले. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याने दीपू (21) आणि प्रदीप (19) च्या मदतीने राजूचे खंडणीसाठी अपहरण केले होते. त्यांना टीव्हीवर क्राइम शो पाहून ही कल्पना सुचली होती. राजूचे अपहरण करून त्याची हत्या करायची आणि मृतदेह पुरायचा आणि त्यानंतर 50 लाखांची खंडणी उकळायची असा त्यांचा प्लॅन होता. त्यासाठी त्यांनी राजूचा फोन स्वतःकडे ठेवला होता. 


शोमध्ये पाहिले, मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची 
मुख्य आरोपी कमल आणि त्याच्या तीन मित्रांनी मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबाबतदेखिल टीव्ही शोमधूनच आयडिया मिळवली होती. त्यासाठी तिघांनी मृतदेह पुरण्यापूर्वी त्याचे सर्व कपडे काढून घेतले. होते. मातीत लवकर विघटन होण्यासाठी त्यांनी तसे केले होते. तसेच पुरलेल्या ठिकाणी पाणीही टाकत होते. 


मलेशियात होता ड्रायव्हर 
कमल मलेशियात ड्रायव्हरचे काम करत होता. तीन महिन्यांपूर्वी तो भारतात परतला होता. याठिकाणी कमलला समजले की, राजूचे वडील मोहर सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी 2.50 कोटींची जमीन विकली आहे. त्यानंतर त्याने क्राइम शो पाहून कट रचला. 


दोन वेळा फसला प्रयत्न 
पोलिसांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांत कमल आणि त्याच्या मित्रांनी दोन वेळा राजूच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. पण त्याला यश आले नाही. त्यानंतर दीपूने राजूशी चांगली मैत्री केली. तो रोज त्याच्याशी बोलू लागला. नवरात्रीला 17 ऑक्टोबर रोजी दीपूने राजूला देवीच्या मंदिरात जाण्याच्या बहाण्याने बोलावले. राजू जेव्हा त्याच्याकडे गेला तेव्हा कमल त्याच्या सफारी कारमध्ये बसवून त्याला गावाबाहेर घेऊन गेला. कमल ने कार सामसून भागात थांबवली आणि तिघांनी राजूचा गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह कमलच्या शेतात नेला आणि खड्डा खोदून तेथे विहिरीजवळ पुरला. 

 

बातम्या आणखी आहेत...