Home | National | Other State | Murder of girl in suspicious circumstances in Sriganganagar

जेवण करताच कुटुंबातील सगळ्यांना यायची झोप, कोणालाच काही कळत नव्हते, रात्री 2 वाजता भावाला आली जाग, समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 16, 2019, 05:52 PM IST

मैत्रिण म्हणाली-आम्ही रात्रभर दोन तरूणांसोबत असायचो.

 • Murder of girl in suspicious circumstances in Sriganganagar

  श्रीगंगानगर(राजस्थान)- अनूपगढच्या चक 15 ए परिसरात गुरूवार रात्री तरूणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांना या प्रकरणात प्रेम संबंध असल्याचा संशय आहे. मृत तरूणी कृष्णा नायकचा मृतदेह शुक्रवारी सकाळी रक्याच्या थोरोळ्यात पडलेल्या अवस्थेत मिळाला. अलबत्ता कंट्रोल रूममधून मिळालेल्या सुचनेच्या आधारावर अनूपगढ पोलिस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्या मुलीच्या अंत्यविधीची तयारी केली जात होती. पोलिसांनी मृतदेहाला ताब्यात घेऊन त्याला शवविच्छेदनासाठी पाठवले.


  कुटुंबीय रात्री झोपताच ती तरूणासोबत बाहेर जायची
  पोलिसांनी तरूणीच्या भावाच्या तक्रारीनुसार खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात तरूणीची मैत्रिण आणि दोन मित्रांची चौकशी केली जात आहे. चौकशी दरम्यान समोर आले की, तरूणी आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीचे दोन मित्र होते. दोघी मुली रात्री आपल्या कुटुंबीयांच्या जेवण्यात झोपेच्या गोळ्या टाकून त्यांना बेशुद्ध करायच्या. घरातील सगले लोक झोपल्यावर त्या मुली त्यांच्या मित्रांसोबत रात्रभर बाहेर असयच्या आणि सकाळी दिवस व्हायच्या आधी परत यायच्या.


  सकाळी जाग आली तेव्हा तरूणीचा झाला होता मृत्यू
  मृत तरूणीचा भाउ ओम प्रकाशने एफआयआरमध्ये सांगितले की, जेवण करताच सगळ्यांना गाढ झोप यायची. अनेक दिवसांपासून कोणालाच कळत नव्हते की, अशी अचानक झोप कसकाय लागत आहे. एके दिवशी अचानक रात्री 2 वाजता मला जाग आली. घरात पाहिले तर कळाले की, कृष्णा घरात नाहीये. मला सगळा प्रकार कळाला आणि मी घरच्यांनाही सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर आम्ही कृष्णाला शोधायला निघालोत. काही वेळेनंर आम्हाला रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह मिळाला.

  तिच्या डोक्यावर जखमांचे निशाण होते. तिच्या मैत्रिणीला विचारल्यावर तिने सांगितले की, कृष्णाचा मृत्यू झाला आहे. रात्री आम्ही दोन तरूणांसोबत गेलो होते. परत येत असताना गाडीत आमची त्या तरूणांसोबत बाचाबाची झाली आणि त्यातच कृष्ण खाली पडली आणि तिच्या डोक्याला मार लागला. हे पाहून मैत्रिण पळून गेली. त्यासोबत तिने कबुल केले की, तरूणांनी त्या दोघींनी गुंगीच्या गोळ्या दिल्या होत्या आणि त्या दोघी रोज कुटुंबीयांना गोळ्या देऊन रात्री तरूणांसोबत जात होत्या.

Trending