आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटच्या वादातून हत्या; सहा ताब्यात, दोघे फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी शहर- नगर जिल्ह्यातील वळण (ता.राहुरी) येथील एका तरुणाची धारदार शस्त्राने २२ वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून रविवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ही घटना झाल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी सोमवारी पहाटे ६ जणांना ताब्यात घेतले, तर दोघे फरार झाले आहेत. 


मंगेश अण्णासाहेब खिलारी (२२) असे मृताचे नाव आहे. गावात कीर्तनाला चाललो, असे सांगून मंगेश घराबाहेर पडला होता. मात्र उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाइकांनी शोध घेतला असता मंगेशचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत वळण मांजरी शीवेवर आढळून आला. शरीराने रांगडा असल्याने मारेकऱ्यांनी अाधी मंगेशच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. नंतर त्याच्यावर २२ वार करून ठार मारले. 


याप्रकरणी पाेलिसांनी सोमवारी पहाटे किरण पोपट कुलट, प्रशांत नारायण शिकरे, सचिन नंदू जाधव, किशोर बाळासाहेब खुळे, लखन बाळासाहेब खुळे, अमोल भाऊसाहेब कुलट (वळण) यांना ताब्यात घेतले, तर या घटनेत सहभागी असलेले किरण बर्डे व दादा कुलट हे फरार झाले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...