Home | Maharashtra | Mumbai | Murder of Shivsena leader at Ulhasnagar area of Thane.

ओव्हरटेक केल्याच्या वादातून शिवसेना नेत्याच्या भाच्याची हत्या, समर्थकांनी केली जाळपोळ

दिव्यमराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 03:29 PM IST

संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यात दोन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

 • Murder of Shivsena leader at Ulhasnagar area of Thane.

  मुंबई- ठाण्यातील उल्हासनगरात ओव्हरटेक केल्याने बुधवारी रात्री एका शिवसेना नेत्याच्या भाच्याची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्‍यात आली. नवीन चौधरी असे मृत तरुणाचे नाव आहे. हत्येनंतर मृताच्या संतप्त नातेवाईकांनी उल्हासनगरात गाड्यांची तोडफोड करत जाळपोळ केली. पोलिसांवरही जमावाकडून दगडफेक करण्यात आली.

  हत्येनंतर फरार झाले मारेकरी

  > शिवसेना नेते जयंत चौधरी यांचा भाचा नवीन दिवाळी साजरी करण्यासाठी बाईकने घरी जात होता. रस्त्याने त्याने एका टोळक्याला ओव्हरटेक केला. त्यावरून टोळक्याने नवीनसोबत बाचाबाची केली. वाद विकोपाला गेल्यानंतर टोळक्याने नवीनवर धारदार शस्त्रांनी वार केले. नवीनचा जागेवरच मृत्यू झाला. नंतर मारेकर पसार झाले.

  पोलिसांवरही दगडफेक

  > घटनेची माहिती मिळताच जयंत चौधरी हे सर्मथकांसोबत घटनास्थळी पोहोचले. समर्थकांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करुन जाळपोळ केली. पोलिसांनी जमावाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु परिस्थिती हाताबाहेर होती. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यात दोन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

  हत्येमागे घातपाताचा संशय

  > या हत्येमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. दिवाळीचे निमित्त साधून नियोजनबद्धरित्या नवीनची हत्या करण्यात आल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

Trending