आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेंबीत भूत असल्याच्या संशयावरून बायकोने सून आणि मुलांसोबत मिळून नवऱ्याला पाजले कुंकूवाचे पाणी, नंतर त्याच्या छातीवर मारल्या जोर-जोरात उड्या; अंधश्रद्धेचा नाहक बळी ठरला नवरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत - सुरतमधील कतारगाम येथे एक व्यक्तीला अंधश्रद्धेमुळे जीव गमावावा लागला. पत्नी हंसा, प्रकाश, दिनेश आणि संजय तीन मुले, मुलगी आणि सासू यांनी 50 वर्षीय कांजी याला कुंकूवाचे पाणी पाजले. त्याची प्रकृती खालावल्यामुळे रात्री एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि उपचारानंतर त्याच्यावर परत घरी तांत्रिक क्रिया सुरू केल्या.

 

सर्व घरची मंडळीनी व्यक्तीच्या छातीवर उड्या मारण्यास सुरूवात केली 
हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर व्यक्तीला पुन्हा कुंकूवाचे पाणी पाजून त्याच्या छातीवर उड्या मारू लागले. फुफ्फुसं आणि छातीच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यु झाला. कुटूंबीयांना पोलिसांना सांगितले की, मृत व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडले होते. पण गावकऱ्यांचे म्हणणे होते की, त्याच्या अंगात देवीचा संचार होतो. 10 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेचा मंगळवारी खुलासा झाला. कांजीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटूंबीयांनी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी आरोपी पत्नी हंसा, सासू, मुलगी आणि प्रकाश, दिनेश आणि संजय यांना बेड्या ठोकल्या आहेत. तर एक जण अद्याप फरार आहे.   

 

कांजीच्या बेंबीत भूत असल्याचा मांत्रिकाचा संशय 

पोलिस उपनिरीक्षक निरज यांच्या मते, कांजीच्या सूनेने सांगितले की. कांजीवर कोणातरी जादूटोणा केला असून त्याच्या बेंबीत भूत आहे. कुंकूवाचे पाणी पाजून छातीवर उड्या मारल्यास त्याच्या तोंडावाटे भूत बाहेर निघून जाईल. अशी माहिती मृत माणसाच्या पत्नी व सासू यांना त्यांच्या गावातील जसरा येथील मांत्रिकाने दिली होती.

बातम्या आणखी आहेत...