आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री पती-पत्नीचे झाले भांडण; आधी 3 वर्षांच्या मुलीला दिला वेदनादायी मृत्यू, मग दीड वर्षाचा मुलगा अन् आईचाही चिरला गळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मालवीय नगरातील हौजरानी परिसरात एका घरात 3 वर्षीय चिमुकलीची हत्या करण्यात आली. तिचा दीड वर्षाचा छोटा भाऊ अन् आईचाही गळा चिरण्यात आला. शनिवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी या तिघांनाही मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथे डॉक्टरांनी सना नावाच्या मुलीला मृत घोषित केले.

 

पोलिस चौकशीत कळले की, आदल्या रात्री दांपत्यामध्ये काही कारणावरून भांडण जुंपले होते. यानंतर महिलेचा पती जुन्या घरी निघून गेला. विवाहिता आणि तिचा मुलगा आता आयसीयूमध्ये दाखल आहेत. पोलिसांनी घटनास्थळी चौकशी केली आणि घटनेत वापरलेला चाकू हस्तगत केला. पोलिसांनी या केसमध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न या आरोपांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, महिलेच्या वडिलांनी तिच्या पतीवर आरोप केले आहेत. पोलिस सर्व पैलू लक्षात घेऊन तपास पुढे नेत आहेत.

 

शेजारी महिला घरी गेल्यावर झाला खुलासा
दक्षिण जिल्ह्यातील अतिरिक्त पोलिस उपायुक्त विजयंता आर्या म्हणाले की, हौजरानी परिसरातील घर नं. 89/2 च्या तिसऱ्या मजल्यावर शमीम हा पत्नी मोहसिना, मुलगी सना आणि मुलगा अनससोबत राहतो. 4 वर्षांपूर्वी मोहसिनाशी लग्न झाले होते. या फ्लॅटमध्ये हे दांपत्य 4 महिन्यांपूर्वीच शिफ्ट झाले होते.

 

शनिवारी 10.50 वाजता पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. सकाळी शेजारी राहणाऱ्या एका महिलेने मोहसिनाला जखमी अवस्थेत पाहिले. तिचा आरडाओरडा ऐकून लोक धावले. यानंतर तिघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. 

 

पतीला दारूचे व्यसन अन् कामधंदा नसल्याने व्हायचा वाद
शमीम आणि मोहसिनामध्ये भांडणाची 2 कारणे समोर आली आहेत. एक शमीम बेरोजगार होता आणि दारू प्यायचा. रात्री खूप उशिरा घरी यायचा. मोहसिनाचे वडील घटनेत सासरच्या पक्षाला जबाबदार धरत आहेत. परंतु पोलिस तपास महिलेकडेच इशारा करत आहे. हे पाऊल महिलेने स्वत: उचलले. तथापि, पोलिसांना आता मोहसिना ठीक होण्याची वाट पाहत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शमीम 2 महिन्यांपासून बेरोजगार होता. त्याला दारूचे व्यसन जडलेले होते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...