आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलानेच आई-वडील आणि बहिणीवर केले धारदार शस्त्राने वार, तिघांचा जागीच मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे

सांगली- सख्या मुलानेच आपल्या आई-वडील आणि बहिणीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी मध्ये ही घटना घडली. एकाच कुटुंबात तिघांच्या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आई-वडील आणि बहिणीच्या हत्या प्रकरणी मुलावर संशय व्यक्त केला जात आहे. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांना अंदाज आहे.

जिल्ह्यातील उमदी गावात अरकेरी दांपत्य आपल्या मुलीसोबत राहत होते. घटना आज(बुधवार) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. गुरलिंगाप्पा अरकेरी(82), पत्नी नागव्वा गुरलिंगाप्पा अरकेरी(75) आणि समुद्राबाई शिवलिंगाप्पा बिरादार(62) अशी मृतांची नावे आहेत.

धारदार शस्त्राने हल्ला करत तिघांचा निर्घृण खून केला आहे. याप्रकरणी मुलगा सिदाप्पा गुरलिंगाप्पा अरकेरी(58) याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.  दरम्यान, उमदीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहचले आहेत.