आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेडरूममध्ये गर्लफ्रेंडसोबत तिच्या मित्राला पाहून भडकला बॉयफ्रेंड, नंतर खून करून मृतदेहाचे केले 300 तुकडे, या प्रकरणावर चित्रपटही बनला आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- वर्ष 2008 मध्ये फिल्म अँड टीव्ही इंडस्ट्रीशी निगडीत एका हत्याकांडाने सर्वांनाच हैराण केले होते. एका प्रोडक्शन हाउसमध्ये काम करणाऱ्या नीरज ग्रोवरचा खून करण्यात आला होता. या हत्येत नीरजची मैत्रिण आणि तिच्या बॉयफ्रेंडचा हात होता. खून केल्यानंतर आरोपीने नीरजच्या मृतदेहाचे 300 तुकडे करून, त्यांना जंगलात फेकले होते. खूप चतुराईने नीरजची मैत्रिण मारीयाने पोलिसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांच्या चौकशीत तिने सर्वकाही कबुल केले होते.

 

यामुळे केला खून
- नीरज आणि मारिया चांगले मित्र होते. मारिया सुसीराज कन्नड चित्रपटांमध्ये काम करत होती. जेव्हा नीरज गायब झाला तेव्हा मारियाने पोलिसांत त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, पण तपासात प्रकरणात वेगळेच वळण आले. घटनेच्या दिवशी म्हणजेच 6 मे, 2008 ला नीरज आणि मारिया मुंबईत एकाच फ्लॅटमध्ये थांबले होते. या दरम्यान मारियाचा बॉयफ्रेंड अॅमिल जेरोमला ते दोघे एकाच घरात असल्याची माहिती मिळाली. नेव्हीमध्ये आधिकारी असलेल्या जेरोमला वाटले की, त्या दोघांचे अफेअर सुरू आहे. त्यांना रेड हँड पकडण्यासाठी तो त्याच दिवसी फ्लॅटवर गेला, त्यांना एकत्र पाहून नीरजचा आणि जेरोमचा वाद झाला आणि रागाच्या भरात जेरोमने नीरजवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने चाकुने नीरजच्या मृतदेहाचे 300 छोटे तुकडे करून बॅगमध्ये भरले. त्यानंर मारियाच्या मदतीने त्याने ती बॅग जंगलात नेऊन जाळली आणि चेनेनईतून पळून गले.


या घटनेवर बनला आहे चित्रपट
- पोलिसांनी तपास करून जेरोमवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला, तर मारियावर पुरावे नष्ट करण्याचे आरोप लागले. या घटनेवर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी 'Not A Love Story' नावाचा चित्रपट बनवला आहे. यात अॅक्ट्रेस माही गिल, दीपक डोबरियाल आणि अजय गेही मुख्य भूमिकेत होते. चित्रपट ऑगस्ट 2011 मध्ये रिलीज झाला होता. तेव्हा राम गोपाल वर्मा यांनी स्पष्ट केले होते की, चित्रपट हा बायोपिक नसून, त्या गोष्टीवरून प्रेरित आहे. 


मारियाची मदत करायचा नीरज 
- मारिया सुजीराज कन्नट चित्रपटात छोटे रोल करत होती. मुंबई टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या दरम्यान तिची ओळख नीरजसोबत झाली. त्या दोघांत चांगली मैत्री झाली होती. नीरज मारियाला रोल मिळवून देण्यात मदत करायचा. मारियाला मुंबईत घर हवे होते, तेव्हादेखील नीरजने तिला मदत केली होती. तिच्याजवळ घर नव्हते तेव्हा काही दिवस मारिया नीरजच्या घरात राहिली होती आणि हेच जेरोमला आवडले नव्हते. 

बातम्या आणखी आहेत...