आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिम संचालकाचा स्पर्धकाकडून सत्तूरचे वार करुन खून, समोर आला मर्डरचा धक्कादायक व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सकाळी विजयी मिरवणुकीत सहभाग, सायंकाळी हत्या

नागपूर- जिम चालवण्याची स्पर्धा आणि त्यातून निर्माण झालेल्या वादातून नागपूर ग्रामीण भागात सावनेर येथे ऑक्सीजन जीमचा संचालक अंगद रवींद्र सिंह (वय 33) याची रविवारी रात्री सत्तूरचे वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सावनेर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर मारेकऱ्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. अंगद सिंह याने राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा अंगरक्षक म्हणूनही काम केले आहे, हे विशेष.

रविवारी रात्री नऊच्या सुमारास सावनेर येथील गुजरवाडी परिसरातील गुप्ता चौकात ही घटना घडली. मृतक अंगद सिंह हा सावनेर परिसरात ऑक्सीजन जिम चालवायचा. तर त्याचा मारेकरी नरेंद्र सिंह यांचेही याच परिसरात जिम होते. दोघांमध्ये व्यवसायिक स्पर्धा होती. त्यावरून सातत्याने वाद व्हायचे. अलिकडेच स्थानिक ब़ॉडीबिल्डींग स्पर्धेत अंगदसिंह हा विजयी ठरला होता. त्याचाही राग नरेंद्र सिंह याच्या मनात होता. रविवारी रात्री अंगद सिंह याला अज्ञात व्यक्तीने फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. तेथे अंगदसिंह आणि नरेंद्र सिंह या दोघांमध्ये पुन्हा वाद होऊन नरेंद्र सिंह याने अंगदच्या डोक्यावर व पोटावर सत्तूरचे वार केले. या हल्ल्यात अंगद सिंह गंभीर जखमी झाला. त्याच्या काही सहकाऱ्यांनी त्याला उपचारासाठी नागपुरात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, वाटेतच त्याने प्राण सोडल्याचे सूत्रांनी सांगितले. ही घटना घडली त्यावेळी नागपुरात नागपूर ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने जल्लोष हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होता.


घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सावनेरला धाव घेतली. घटनास्थळी जमाव जमला होता. पोलिसांनी जमावाला शांत करून आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले. यानंतर रात्री मारेकरी नरेंद्र सिंह याने सावनेर पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी घटनास्थळी चौकशी केल्यावर आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेरांमध्ये ही घटना रेकॉर्ड झाल्याने पोलिसांकडून या फुटेजची मदत घेतली जात आहे. दरम्यान, अंगद सिंह याने पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा अंगरक्षक म्हणूनही कधीकाळी काम केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सकाळी दोघेही विजयी मिरवणुकीत


राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या समर्थकांनी काल रविवारी त्यांची विजयी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत अंगद व नरेंद्र हे दोघेही सहभागी झाले होते. सावनेर पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे. या दोघांमधील अनेक वर्षांपासूनचा वाद मिटविण्यासाठी स्वत: केदार यांनीही प्रयत्न केले होते, अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली.  

बातम्या आणखी आहेत...