आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षुल्लक कारणावरून वाद, संशयातून पत्नीच्या पोटात खुपसले धारदार शस्त्र...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर पतीने पत्नीचा खून केल्याची घटना मुकुंदवाडी भागात मंगळवारी पहाटे घडली. रागाने बेभान झालेल्या पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या पोटात स्क्रू ड्रायव्हरसारखे धारधादार शस्त्र खुपसले. नंतर गळा दाबून तिचा खून केला. ज्योती बाळासाहेब शिंदे (४०, रा. महालक्ष्मीनगर, मुकुंदवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, खून केल्यानंतर पती बाळासाहेब शिंदे (अंदाजे ६०) पसार झाला असून त्याच्या शोधासाठी तीन पथके नेमली आहे. 


१५-२० वर्षांपूर्वी शहरात येऊन स्थायिक झालेले शिंदे दांपत्य रुग्णालय तसेच घरी जाऊन रुग्णांची सेवा करण्याचे काम करत होते. महालक्ष्मीनगरात त्यांचे स्वत:चे तीन खोल्यांचे घर होते. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा वैभव महाविद्यालयीन शिक्षण घेतो, तर छोटा मुलगा ओम दहावीत आहे. बाळासाहेब नेहमीच क्षुल्लक कारणावरून ज्योतीशी वाद घालत हाेता. सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कामावरून परतल्यावर त्याने घरासमोर उभ्या गाडीवरून वाद घालण्यास सुरुवात केली. या वेळी ओम व वैभव घरातच होते. वाद सुरू असताना ज्योती यांचा मुलगा वैभव मित्राकडे झोपण्यासाठी गेला. परंतु ओम मात्र आई-वडिलांना समजावत वाद सोडवण्याचे प्रयत्न करत घरातच थांबला होता. घराजवळ लावलेल्या दुचाकीवरून बाळासाहेबने ज्योतीवर संशय घेतला. 


रात्री साडेदहा कराच्या सुमारास वाद थांबला. ज्योती व ओम शेजारी झोपी गेले. परंतु पहाटे तीनच्या सुमारास बाळासाहेबने स्क्रू ड्रायव्हरसारखे धारदार शस्त्र ज्योतीच्या पोटात खुपसले. असह्य वेदना झाल्याने ज्योती जोरात ओरडल्या. त्यांच्या आवाजाने ओम झोपेतून जागा झाला. रागाने बेभान झालेल्या बाळासाहेबने शस्त्र खुपसल्यानंतर ओमसमोरच ज्योती यांचा गळा दाबून खून केला. मुकुंदवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा केला असून उपनिरीक्षक भदरगे तपास करत आहेत. 


रागाच्या भरात तिला फरपटत नाल्यात फेकले 
पोटात शस्त्र खुपसल्यानंतर ज्योती किंचाळल्या. तो आवाज ऐकून ओमही जागा झाला. संतापलेल्या बाळासाहेबचा राग पाहून तोही घाबरला होता. ज्योती यांचा श्वासोच्छ्वास सुरू असलेला पाहून त्याने गळा दाबला. त्यांना फरपटत घरासमोरील नाल्यात फेकून तो दुचाकीवरून पसार झाला. आईला जखमी अवस्थेत पाहून ओमने ही बाब पोलिसांना कळवली. गस्तीवरील पोलिसांनी ज्योती यांना घाटीत दाखल केले. परंतु पहाटे सव्वापाच वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच ज्योती यांच्या चाळीसगाव येथील माहेरकडील नातेवाइकांनी घाटी रुग्णालयात गर्दी केली होती. 


मुलगा म्हणतो, वडील नेहमीच घालायचे वाद 
सोमवारी रात्री नऊ वाजता बाळासाहेब कामावरून घरी परतला. घरासमोर उभ्या मोपेडचे रीडिंग (किलोमीटरचे आकडे) दहा ते वीस किलोमीटर वाढल्याचे पाहताच तो संतापला. घरात जाऊन त्याने पत्नीसोबत टोकाचा वाद घालण्यास सुरुवात केली. यापूर्वीही किरकोळ कारणावरून ते ज्योती यांच्यासोबत वाद घालत असल्याचे मुलांनी पोलिसांना सांगितले. हा सर्व प्रकार पाहणाऱ्या ओमचा जबाब नोंदवून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेबच्या शोधासाठी तीन पथके तैनात करण्यात आल्याचे निरीक्षक नाथा जाधव यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...