आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोपडा: चहार्डीत रक्ताने माखलेल्या कपड्यांमुळे खळबळ..बेपत्ता विद्यार्थ्याचा खून; शेतात आढळले शरीराचे तुकडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- नरबळीची शंका
- पोलिसांनी जारी केले संशयितांचे स्केच आणि सीसीटीव्ही फुटेज

 

चोपडा- तालुक्यातील चहार्डी येथील बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याचा खून झाल्याचे मंगळवारी दुपारी उघडकीस आली होती. गावातील शिवाजीनगर भागात त्याच्या शरीराचे काही अवयव, कपडे, चप्पल आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताचे स्केच आणि सीसीटीव्ही फुटेज बुधवारी जारी केले आहे. अद्याप बालकाचा मृतदेह आढळून आलेला नाही.

 

काय आहे प्रकरण?
चहार्डी येथील मंगेश दगडू पाटील (वय-12) हा 2 फेब्रुवारी रोजी आजोबा लोटन राघो पाटील यांना शौचास घेऊन जातो, असे सांगून गेला होता. त्यानंतर तो परत आला नाही. त्याचे वडील दगडू लोटन पाटील यांनी शोधाशोध केली. मात्र, तो आढळून आला नाही. त्यामुळे सोमवारी चोपडा पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी सरपंच उषाबाई पाटील यांचा मुलगा दत्तात्रय हा पाण्याचा खासगी हाळ भरण्यासाठी आला असता या हाळाजवळ तुटलेला पाय दिसून आला. त्यांनी लागलीच पोलिस पाटील रोहित रायसिंग यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली होती.

 

नरबळीची शंका?
अपहरण झालेल्या मंगेशचा खून झाला की त्याचा नरबळी देण्यात आला? अशी शंका उपस्थित केली जात आहे. शाळकरी बालकाचा निर्घृण खून केल्याच्या घटनेन संपूर्ण गाव सून्न झाले आहे.

 

श्वान पथकही अपयशी
भगवान न्हावी यांच्या शेतात पायाचा तुकडा तर कपडे, चप्पल, रक्त लागलेले दगड चंद्रकांत हरी पाटील यांच्या पडीक शेतात सापडले. त्यांच्या घराजवळही शरीराचे काही अवयव आढळून आले. ज्या ठिकाणी रक्ताने माखलेले दगड होते, त्यापासून 50 फूट अंतरावर नांगरटी केलेल्या शेतात विळा लपवलेल्या अवस्थेत गावकर्‍यांना दिसला. तपासासाठी श्वान पथक मागवण्यात आले होते. मात्र, सायंकाळपर्यंत काहीही हाती लागले नाही. घटनास्थळी पोलिस पथक आले होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... पोलिसांनी जारी केलेले संशयितांचे स्केच आणि सीसीटीव्ही फुटेज

 

बातम्या आणखी आहेत...