• Home
  • Murrah breed buffalo made record of giving 33 litres milk, 160 millilitres more than Pakistani buffalo

पंजाब / मुर्राह जातीच्या म्हशीने बनवला 33 लीटर दूध देण्याचा रेकॉर्ड, पाकिस्तानी म्हशीपेक्षा 160 मिलिलिटर जास्त

यापूर्वी सर्वात जास्त 32.50 लीटर दूध देण्याचा रेकॉर्ड पाकिस्तानच्या एका म्हशीच्या नावे होता

दिव्य मराठी वेब टीम

Dec 11,2019 11:18:00 AM IST

लुधियाना : हरियाणाच्या मुर्राह जातीची एक म्हैस सरस्वतीने 32.66 लीटर दूध देण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड पाकिस्तानच्या फैसलाबाद येथील एका म्हशीच्या नावे होता. जिने 32.50 लीटर दूध दिले होते. सरस्वतीचे मालक हिसारचे सुखबीर सिंह ढांडा आहेत.

त्यांनी सांगितले, लुधियानाच्या जगरांवमध्ये सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय पीडीएफ डेअरी एक्सपो 2019 मध्ये हा रेकॉर्ड झाला. सुखबीर म्हणाला की, अनेक लोकांनी सरस्वती खरेदी करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला. काहींनी तर मला 51 लाख रुपयाची ऑफर दिली, पण मी नकार दिला. मी हिला स्वतःपासून दूर करू शकत नाही.

अशा आणखी दोन म्हशी गंगा आणि जमुना आहेत...

सुखबीरने सांगितले, आम्ही अशातच तिचे एक वासरू तामिळनाडूच्या एका व्यक्तीला 4.5 लाख रुपयांमध्ये विकले गेले आहे. आमच्याकडे आणखी दोन म्हशी - गंगा, जमुना आहेत. यात्रेत रिझल्ट अनाऊन्स झाल्यानंतर सरस्वतीला पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी झाली होती.

X
COMMENT