आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Museum Activities, Telling The Younger Generation Through Emoji The Secrets Of History, Youngsters Showing Interest In The Exhibition

संग्रहालयाचा उपक्रम, युवा पिढीला इमोजीद्वारे सांगताहेत इतिहासाचे रहस्य, प्रदर्शनात तरुण दाखवत आहेत रस

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

जेरुसलेम : इतिहासातील अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. भाषा व लिपीची अनेक रहस्ये तशीच राहतात. इस्रायलच्या संग्रहालयात इजिप्तच्या इतिहासातील रहस्यांना इमोजीच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

इस्रायलच्या संग्रहालयात 'इमोजीलिफ्स' प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यात सध्याच्या युगात वापरली जाणारी इमोजीत इजिप्तची संस्कृती समजावण्यात आली आहे. प्रदर्शनाचे संचालक शर्ली बेन-डोर एव्हियन यांचे म्हणणे आहे की, चित्रलिपींच्या माध्यमातून तत्कालीन इतिहास समजावण्यात मला कठीण जाते. माझ्या डोक्यात आले की, सध्याच्या काळात आपण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी छायाचित्रे किंवा इमोजी वापरतो. यातील काही इमोजी अशा आहेत, ज्या चित्रलिपींशी मिळत्याजुळत्या आहेत. एव्हियन यांच्या म्हणण्यानुसार माणसाच्या मूळ भावना व्यक्त करण्यासाठी काही अभिव्यक्ती नेहमीच सारख्या असतात. सध्याच्या काळात नृत्यासाठी हात वर केलेल्या इमोजीचा वापर केला जातो. तसाच प्रयोग ३००० वर्षांपूर्वीच्या काळात चित्रलिपीतही होत होता. त्यांनी सांगितले की, हजारो वर्षांचे अंतर व सांस्कृतिकदृष्ट्या खूप वेगळा समाज असूनही काही चित्रलिपी आणि इमोजींमध्ये समानता आहे. प्राचीन गोष्टी आजही प्रासंगिक असल्याचे सांगत नव्या पिढीला जोडू शकतो.
 

बातम्या आणखी आहेत...