आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Music Composer Shekhar Ravjiani Bought Three Eggs For Rs 1672, Shared Bill On Twitter

म्युझिक कंपोजर शेखर रावजियानीने खरेदी केली 1672 रुपयांत तीन अंडी, ट्विटरवर शेअर केले बिल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रसिद्ध म्युझिक कंपोजर शेखर रावजियानीने ट्विटरवर एक बिल शेअर केले आहे. खास गोष्ट ही आहे की, त्याने पोस्ट केलेल्या बिलमध्ये तीन उकडलेल्या अंड्यांची किंमत 1672 रुपये लिहिली गेली आहे. त्याने ही खूप जास्त असल्याचे सांगितले. यापूर्वीही बॉलिवूड अभिनेता राहुल बोसनेदेखील याचप्रकारचे बिल शेअर केले होते. ज्यामध्ये दोन केळींची किंमत 442 रुपये होती.  

अहमदाबादच्या हयात रिजेन्सी येथे पोहोचलेल्या कंपोजरने तीन अंड्यांचे ऑर्डर दिले, पण बिल पाहून तोदेखील हैराण झाला. शेखरने ट्विटरवर बिलचा फोटो शेअर करत लिहिले, 3 अंड्यांची किंमत 1672 रुपये, ही मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. मात्र बिल व्हायरल झाल्यानंतर यूजर्सने त्याची खूप खिल्ली उडवली आणि हॉटेलचे समर्थन केले.  यापूर्वीही जुलैमध्ये अभिनेता राहुल बोसने याचप्रकारची तक्रार केली होती. त्याने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून सांगितले होते की, चंदीगड येथील जेडब्ल्यु मारियात हॉटेलमध्ये दोन केळीची किंमत 442 रुपये आहे. मात्र कर विभागाने हॉटेलवर जास्त किंमत वसूल केल्याने 25 हजारांचा दंड लावला होता.