आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- उत्तर-पूर्व दिल्ली जेव्हा तीन दिवसांपासून हिंसेच्या आगीत जळत होती, तेव्हा काही ठिकाणी हिंदू-मुस्लिम एक होऊन मानुसकीचे दर्शन देत होते. विजय पार्क आणि यमुना विहार परिसरात दोन्ही समाजांनी मिळून कॉलोनीत घुसत असलेल्या दंगेखोरांना पळवून लावले. फक्त रस्त्यालगत असलेल्या काही घरांचे नुकसान झाले, इतर सर्व कॉलोली सुरक्षित आहे. दुसरीकडे, चांदबागमध्ये मुस्लिमांनी हिंदूंसोबत मिळून मानवी साखळी तयार केली आणि मंदिराची नासधुस होण्यापासून रोखले. विजय पार्कमधील गल्ली नंबर-17 चे रहिवासी राकेश जैनने सांगितले की, यमुना विहारच्या सी-12 मधील मंदिर आणि मशीद 100 मीटर अंतरावर आहेत. संध्याकाळी मशिदीतून अजान आणि मंदिरातून शंखनाद एकाच वेळी होतो. कॉलोनीतील सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे आहेत. मुस्लिम समाजातील लोक आमचे भाऊ आहेत. कधीही गरज पडल्यावर ते आमच्यासाठी आणि आम्ही त्यांच्यासाठी हजर असतोत. दंगलखोर बाहेरुन येत होते, पण आम्ही त्यांना कॉलोनीत येऊ दिले नाही. दोन्ही समाजाने मिळून मंदिर-मशिदीला धक्काही लागू दिला नाही याच परिसरात मागील 20 वर्षांपासू राहत असलेले सुहैल मंसूरी यांनी सांगितले की, परिसरात मागील अनेक वर्षांपासून दोन्ही समाज एकतेने राहतात, त्यामुळे मशीद किंवा मंदिराला धक्काही लागला नाही. सी-12 चे रहिवासी राहुलने यांनी सांगितेली की, मागील 35 वर्षात पहिल्यांदाच इथे धार्मिक हिंसा झाली आहे. दंगेखोर आमच्या मार्केटमध्ये घुसल्यावर आम्ही सर्वांनी मिळून त्यांना हकलून लावले. याच भागात राहणाऱ्या मोहम्मद जाकिरने सांगितले की, आमचे हिंदूंसोबत खूप चांगले संबंध आहेत. ईदला ते आमच्या घरी येतात आणि दिवाळीला आम्ही त्यांच्या घरी जातोत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.