आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम देशांमध्ये देवीचे मंदिर, पाहा कशी करतात हिंदू पूजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतामध्ये देवीचे मंदिर तुम्हाला जागोजागी दिसतील, यामध्ये काहीही चकित करणारे नाही. परंतु मुस्लिम देशामध्ये देवीचे मंदिर असणे हे तुम्हाला नक्की चकित करू शकते. एवढेच नाही तर, हे मंदिर प्राचीन काळापासून आहेत आणि यांचे चमत्कारही स्थानिक मुस्लिम मानतात. येथे जाणून घ्या, मुस्लीम देशातील देवी मंदिर जेथे भक्त दररोज करतात पूजा-अर्चना.


अफगाणिस्तान एक मुस्लिम देश आहे. या देशाची राजधानी काबुल येथे देवीचे एक मंदिर आहे. हे आसामाई मंदिर नावाने ओळखले जाते. या संबंधित अशी मान्यता आहे की, ही आस (इच्छा) पूर्ण करणारी देवी असून पर्वताच्या टोकावर निवास करते.


देवीच्या या मंदिरात विविध हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. या मंदिराजवळ एक मोठी शिळा असून ही 'पंजसीर का जोगी' नावाने ओळखली जाते. यामागे अशी कथा आहे की, जवळपास 150 वर्षांपूर्वी येथे हा व्यक्ती तपश्चर्या करण्यासाठी आला होता. स्थानिक लोकांनी याला त्रास दिल्यानंतर हा शिळेमध्ये परिवर्तित झाला. तेव्हापासून ही शिळा 'पंजसीर का जोगी' नावाने ओळखली जाते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन मुल्सिम देशातील देवी मंदिरांविष्यी....

बातम्या आणखी आहेत...