आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम शिक्षकाने आपल्या हिंदू मित्राला दिला मुखाग्नी, हिंदू परंपरेनुसार दशक्रिया विधित मुंडन करुन कुटुंबासोबत 11 दिवस दु:खात होणार सहभागी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलपाईगुडी- आतापर्यंत तुम्ही हिंदू मुस्लिम यांच्या मैत्रीच्या अनेक घटना पाहिल्या असतील. अशीच काहीशी अभिमानास्पद घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. इथे एका मुस्लिम शिक्षकाने आपल्या हिंदू मित्राला मुखाग्नी देऊन त्याचे अंत्य संस्कार केले आहे. त्याने हिंदू परंपरेनुसार अंत्य संस्कारावेळी आपले मुंडन केले आहे. अशफाक असे या शिक्षकाचे नाव असून संजन कुमार विश्वास असे मृत शिक्षकाचे नाव आहे. संजन कुमार यांना तीन मुली असल्यामुळे अशफाक यांनी त्यांना मुखाग्नी दिला. अशफाक यांनी सांगितले की, 'अशफाक संजन कुमार यांना आपले मार्गदर्शक मानत होते. त्यांनी आपल्याला माणुसकीचे धडे शिकवले. त्यांना वडील मानत असल्याने त्यांचे अंत्य संस्कार केले.' 

 

मुस्लिम मित्राने केले हिंदू मित्राचे अंत्य संस्कार

> जलपाईगुडी जिल्ह्यातील बनरहट गावात अशफाक एका सरकाळी शाळेत शिकवतात. त्यांचे मित्र संजन कुमार विश्वास हेदेखील त्याच शाळेत शिकवत होते.
> संजन 2005 मध्ये आपल्या सेवेतून निवृत्त झाले होते. परंतु शाळेतून निवृत्त झाल्यानंतरही दोघांमधील मैत्री कमी झाली नव्हती. अशफाक त्यांना आपले मार्गदर्शक मानत होते.
> संजन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबात तीन मुली असल्याने अशफाक यांनी त्यांच्या मित्राला मुखाग्नीद देण्याचा निर्णय घेतला.

 

वाईट काळात दिली होती साथ

> अशफाक यांनी जुन्या दिवसांची आठवण काढताना सांगितले की, ज्या दिवशी शाळा वर्धापन दिन साजरा करत होती त्याच दिवशी माझी या शाळेत अपॉइंटमेंट झाली होती.
> त्या शाळेत अनेकजण धर्माच्या आधारावर माझ्या अपॉइंटमेंटचा विरोध करत होते. परंतु संजन यांनी त्यावेळी माझ्या बाजुने उभे राहून मला साथ दिली.
> त्यांनी मला सर्व गोष्टींवर दुर्लक्ष करण्यासाठी सांगितले. एवढेच नाहीतर मला नविन घर मिळेपर्यंत त्यांनी मला त्यांच्या घरी ठेवले. 
> अशफाक यांनी सांगितले की, ते धर्माऐवजी मानवतेवर विश्वास ठेवत होते. त्यामुळेच मलाही सर्व धर्म सारखेच असतात अशी शिकवण मिळाली.

 

संजन माझ्या वडिलांसारखे होते

अशफाक यांनी सांगितले की, मी उदारवादी विचारांचा व्यक्ती आहे. मी नेहमी सांगतो की, मला तिन वडील आहे. एक- ज्यांनी मला जन्म दिला. दुसरे- माझे गुरु आणि तिसरे संजन सर. संजन कोणत्याच गोष्टींचा विचार करत नव्हते. ते नेमही सत्याच्या मार्गावर चालत राहिले. मीही तेच करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...