आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमियतला निकाल अमान्य, हक्क मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ / अयोध्या - अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्ड आणि जमियत उलेमा-ए-हिंद या संघटनांना मान्य नाही. दोन्ही संघटनांनी यावर फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. 
९ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने हा निकाल दिला होता. यात वादग्रस्त २.७७ एकर जमीन रामलल्लास सोपवण्यात आली होती. शिवाय, मशिदीसाठी अयोध्येत ५ एकर जमीन देण्याचे आदेश दिले होते. 

अन्सारी यांचा विरोध :


अयाध्येतील बाबरी मशिदीचे पक्षकार व मुख्य याचिकाकर्ते इक्बाल अन्सारी यांनी अशा फेरविचार याचिका दाखल करण्याच्या निर्णयास विरोध केला आहे. हा वाद आता संपला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निर्मोही आखाड्यास निकाल मान्य

सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा सन्मान करून हा निकाल मान्य करण्याचा निर्णय निर्मोही आखाड्याने घेतला आहे. सर्व संतांनी हा निकाल मान्य करताना यावर फेरविचार याचिका दाखल करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...