Home | Jeevan Mantra | Teerath Darshan | Muslim Woman is Worshiped In This Temple

गुजरातमधील या मंदिरात मुस्लिम महिलेची करतात पूजा, सुमारे 800 वर्षांपूर्वीचे आहे हे मंदिर; अंतराळवीर सुनीता विलियम्स आली होती दर्शनाला

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 12, 2019, 04:30 PM IST

गावातील माता मुस्लिम असूनही गावात एकही मुस्लिम परिवार नाही

 • Muslim Woman is Worshiped In This Temple


  जीवन मंत्र डेस्क - गुजरातची राजधानी अहमदाबादपासून 40 किलोमीटर अंतरावर झुलासन नावाचे एक गाव आहे. येथील डोला माता मंदिर या गावाचे वैशिष्ट्य आहे. डोला माताचा उल्लेख हिंदू ग्रंथात कुठेच नाहीये. मुस्लिम महिलेची पुजा करण्यात हे जगातील पहिलेच मंदिर असेल. या मंदिरात दर्शन घेणाऱ्यांची इच्छा पूर्ण होते असे मानले जाते. हे मंदिर हिंदू-मुस्लिम एकता एकता आमि मुस्लिम महिलेच्या शौर्याचे प्रतिक आहे. ग्रामस्थांच्यामते डोला माता गावाची रक्ष करते आणि लोकांच्या अडचणी दूर करते.

  देवीच्या रुपात मुस्लिम महिलेची करतात पूजा
  या मंदिरात डोला माता नावाच्या मुस्लिम महिलेची पूजा करण्यात येते. या मंदिराबाबत सांगण्यात येते की, 800 वर्षांपूर्वी या गावावर काही लोकांनी हल्ला केला होता. त्यावेळी डोलाने शौर्याने गावाची रक्षा करताना शहीद झाली होती. डोलाचे शरीर फुलामध्ये बदलल्याचे सांगितले जाते. डोलाचा मृत्यू झालेल्या ठिकाणी तिची वीरता आणि सन्मानात ग्रामस्थांनी त्याठिकाणी मंदिर निर्माण केले. तेव्हापासून ते तिची दैवीय शक्तीच्या रूपात पूजा करत आहेत.


  मंदिरात नाही कोणतीही मूर्ती
  गावकऱ्यांनी येथे डोला मातेचे एक भव्य मंदिर निर्माण केले आहे. हे मंदिर भव्यतेसोबत सुंदर आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी 4 कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. या मंदिरात मूर्ती नाहीये. येथे फक्त एक रंगीत कपडा टाकलेला एक दगड आहे. कपड्याने झाकलेल्या या दगडाला डोला माता समजून तिची पूजा करण्यात येते.


  येथील मंदिरच नाही तर हे गाव देखील आहे खास
  भारतीय अंतराळवीर सुनिता विलियम्स आपल्या वडिलांसोबत या गावात डोला मातेच्या दर्शनासाठी आली होती. तेव्हा हे गाव चर्चेत आले होते. या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील प्रत्येक घरातील एक तरी सदस्य विदेशात आहे. गावातील विष्णु पटेल यांनी सांगितले की, डोला माता मुस्लिम असुनही गावात एकही मुस्लिम परिवार नाही. रविवार आणि गुरुवार हे डोला मातेचा दिवस मानले जातात. यादिवशी डोला मातेच्या दर्शनासाठी परिसरातील गावातून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने येतात.


  अंतराळवीर सुनीता विलियम्सचा गावाशी आहे संबंध
  झुलासन गावातील विदेशात स्थायिक झालेल्या लोकांमध्ये अंतराळवीर सुनीता विलियम्सचे वडील दीपक पंड्या यांच्या देखील समावेश आहे. दीपक पंड्या वयाच्या 22 व्या वर्षापर्यंत झुलासनमध्ये राहिले होते. त्यानंतर ते अमेरिकेत गेले. सुनीता विलियम्सने अंतराळात जाण्यापूर्वी आपल्या सोबत डोला मातेचा आशिर्वाद घेण्यासाठी झुलासनमध्ये आली होती.

Trending