Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Muslim youths protest for Maratha reservation

मराठा अारक्षणासाठी मुस्लिम तरुणांचे मुंडन

प्रतिनिधी | Update - Aug 04, 2018, 11:49 AM IST

शहरातील अनेक मुस्लिम बांधवांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जाहीर पाठिंबा देऊन शुक्रवारी तहसीलदार किशोर कदम

  • Muslim youths protest for Maratha reservation

    कोपरगाव- शहरातील अनेक मुस्लिम बांधवांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जाहीर पाठिंबा देऊन शुक्रवारी तहसीलदार किशोर कदम यांना निवेदन दिले. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुंडन करत सरकारचा निषेध करण्यात आला.


    तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सगळ्या क्षेत्रांत आरक्षण द्यावे, तसेच आंदोलनादरम्यान मराठा बांधवांवर झालेले गुन्हे मागे घ्यावेत. यावेळी अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद, मोसीन सय्यद, आरिफ मणियार, सोनू शेख, हुसेन तांबोळी, शफिक शेख,अब्बास पठाण, जावेदगफूर शेख, आरिफ तांबोळी, जावेद पठाण, राहुल काकडे, अबुबकर सय्यद, नाजीम शेख, अब्बास बोक, जावेद शेख, मोबिन सय्यद, वसीम शेख, वालिद मणियार यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Trending