Home | Business | Auto | must read this before modifying your bike

बाइक Modify करण्यापूर्वी आवश्य वाचा हे नियम; अन्यथा पोलिस फाडतील दंडाची पावती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 03, 2018, 12:04 AM IST

यात चुकीचे काहीच नाही पण असे करताना तुम्ही आरटीओच्या कोणत्या नियमाचे उल्लंघन तर करीत नाही ना याची खात्री करणे गरजेचे आहे

 • must read this before modifying your bike

  युटिलिटी डेस्क - बाईक शौकिन आपल्या दुचाकीला अनेक मोडिफाय करतात. यात तरुणाईची विशेष आघाडी असते. लूक आणि स्टाईलसाठी ते असे करत असतात. यात चुकीचे काहीच नाही पण असे करताना तुम्ही आरटीओच्या कोणत्या नियमाचे उल्लंघन तर करीत नाही ना याची खात्री करणे गरजेचे आहे. नाहीतर तुमचे वाहन जप्तही होऊ शकते.


  मोटार वाहन कायदा 1988 नुसार फॅक्ट्री मॉडेलमध्ये करण्यात आलेला कोणताही बदल हा बेकायदेशीर असतो. असा कोणताही बदल ज्यामुळे वाहनाचे वजन 10 पटीने वाढेल करायचा असल्यास तो वाहन निर्मात्यास आणि आरटीओला कळवणे बंधनकारक आहे. तुम्ही असा बदल केल्यास तुमचे वाहन जप्त होऊ शकते तसेच तुमच्यावर दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते.


  नवा एक्झॉस्ट
  - अनेक स्वस्त दुचाकी या एक्झॉस्ट फ्री फ्लो असणाऱ्या आणि कॅटेलिटिक कन्वर्टर असणाऱ्या असतात. या दुचाकीतुन बाहेर पडणाऱ्या विषारी घटकांपासून पर्यावरणाचे रक्षण करतात. पण फ्री फ्लो एक्झॉस्ट दुचाकीतुन निघणारा आवाजही वाढवतो. फ्री फ्लो एक्झॉस्ट लावल्याने होणारे नुकसान जास्त आहे. जास्त आवाज आणि उर्त्सजित होणाऱ्या घटकांमुळे आरटीओ आणि पोलिस तुमच्यावर कारवाई करु शकतात. तुमचे वाहनही ते जप्त करु शकतात.


  पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी महत्वाची माहिती...

 • must read this before modifying your bike

  इंजिनमध्ये बदल
  एका दुचाकीत इंजिनाशिवाय अनेक बाबी असतात. या एक्‍स्‍ट्रा गोष्टी विशेषत: एक्झॉस्ट सि‍स्‍टम त्याच इंजिनासोबत काम करते जी कंपनीने लावली आहे. अनेक बाईक मोडि‍फाय करणारे एक्‍स्‍ट्रा पॉवरसाठी  सि‍लेंडर सोबत छेड़छाड़ करून इंजिन बदलतात. 

  याशिवाय दूसरे मोडि‍फि‍केशन जसे की कार्बोरेटरच्या नोझलचा आकार वाढवणे करतात. यामुळे त्यांना एक्‍स्‍ट्रा फ्यूल आणि जु्न्या स्‍टॉक एअर फि‍ल्‍टरला नव्याने बदलता येते. या पध्दतीच्या मोडि‍फि‍केशनमुळे तुमच्या आरसीत असलेली इंजिन स्‍पेसि‍फि‍केशन बदलते. यामुळे तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. इंजिन मोडि‍फि‍केशन परवानगी मुळीच नसते.

 • must read this before modifying your bike

  चेसीत बदल
  चासी कापणे, एक्‍स्‍ट्रा मेटलसोबत वेल्‍डिंग करणे अथवा त्याचा आकार बदलणे बेकायदेशीर आहे. अनेक जण चेस्‍सी बदल असल्याने मोटारसायकल ओळखू सुध्दा येत नाही. चासी मोडि‍फाय केल्याने मोटारसायकलीची इंटि‍ग्रेटी खराब होते. आरटीओ अशा वाहनाला धोकादायक मानते.

 • must read this before modifying your bike

  दोनपेक्षा अधिक चाके लावणे
  तुमच्या वाहनाची आरसी एक कायदेशीर दस्तावेज आहे. यात तुमच्या वाहनाची सगळी माहिती असते. यात जर टू-व्‍हील्‍स लिहिलेले असेल तर लक्षात घ्या की तिथे तीन किंवा चार व्‍हील्‍स नकोत. अर्थात दिव्यांग व्यक्ती आरटीओच्या मंजूरीने एक्स्ट्रा व्हील्स लावू शकतात आणि याची माहिती त्यांच्या आरसीत असते. 

Trending