आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - कोणतेही काम न करता तुम्ही मासिक 4 लाख रुपये उत्पन्नाची व्यवस्था करू शकता, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. परंतु हे शक्य आहे. त्यासाठी आपल्याला दीर्घ कालावधीसाठी म्युच्युअल फंड अर्थात SIP मध्ये (सिस्टिमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लान) गुंतवणूक करावी लागेल.
फायनान्शिअल प्लॅनर तारेश भाटिया यांच्या मते, दरमहा 4 लाख रूपयांची कमाई करणे शक्य आहे. यासाठी आपल्याला दरमहा SIP मध्ये ठराविक रकमेची काही कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागते.
18,794 रुपये करावी लागेल मासिक गुंतवणूक
> तारेश भाटिया यांनी सांगितले की, मासिक 4 लाख रुपयांच्या उत्पन्नासाठी तुम्हाला SIP मध्ये 18,794 रुपये मासिक गुंतवणुकीला सुरूवात करावी लागेल. त्यानंतर, आपल्याला SIP मध्ये 10 टक्क्याने आपली गुंतवणूक वाढवावी लागेल. या गुंतवणुकीवर दरवर्षी 15 टक्के व्याज मिळत असेल तर 20 वर्षांमध्ये 5 कोटी रुपयांचा निधी तयार होईल. इक्विटी फंडांमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास आपल्याला 15% पेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.
कसे मिळेल 4 लाख रुपयांची मासिक उत्पन्न?
> तारेश भाटिया यांच्या मते, तुम्ही एकाच वेळी म्युच्युअल फंड योजनांमध्ये 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यावर तुम्हाला 10 टक्के वार्षिक परतावा मिळाला तर तुम्हाला दरवर्षी 50 लाख रुपये मिळतील. अशा प्रकारे आपण आपल्यासाठी दरमहा सुमारे 4 लाख रुपयांची मिळकत सुनिश्चित करू शक्तो.
गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या गोष्टी
> तारेश भाटिया यांनी सांगितले की, 7 टक्के महागाईनुसार पुढील 20 वर्षांत आजच्या 50 लाख रुपयांचे मूल्य 1 कोटी 30 लाख होईल. याशिवाय, तुम्हाला इक्विटी फंडामध्ये गुंतवणुकीसाठी दरवर्षी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळत असेल तर त्यावर 10% कॅपिटल गेन टॅक्स लागेल. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपण एंट्री आणि एक्झीट क्लॉज समजून घेणे गरजेचे आहे. इक्विटी फंडमध्ये गुंतवणुकीचा धोका जास्त आहे. अशावेळी आपण एखाद्या सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनरच्या सल्ल्यानुसारच गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते
50 व्या वर्षी होऊ शकता निवृत्त
> आता आपण 30 वर्षांचे आहात आणि 50 वर्षांच्या वयात निवृत्त होऊ इच्छित असल्यास, ही योजना आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही 50 वर्षांच्या वयात निवृत्त झाल्यावर आपल्याकडे असणाऱ्या 5 कोटी रूपयांची गुंतवणूक करून त्यावर मिळणाऱ्या परताव्यावर तुम्ही तुमचा खर्च पूर्ण करू शकता तसेच 5 कोटी रूपयांचा फंड तसाचा तसा शिल्लक राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.