आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Mutual Funds In This Sector Have A Return Of Up To 30% This Year, Despite The Banking Sector Crisis

बँकिंग क्षेत्रातील संकटानंतरही या क्षेत्रातील म्युच्युअल फंडांचा यंदा 30% पर्यंत परतावा

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • म्युच्युअल फंडांच्या इक्विटी श्रेणीत ईएलएलएस, बँकिंग, लार्ज अँड मिड कॅप आणि स्मॉल कॅप क्षेत्राचे विश्लेषण
 • टाटा बँकिंग अँड फायनान्शियलने या वर्षी 30.51 टक्के तर सुंदरम फायनान्शियल सर्व्हिसेसने 29.80 टक्के परतावा दिला
 • ईएलएसएसमध्ये एसबीआय टॅक्स अॅडव्हान्टेज सिरीज 3 डायरेक्ट ग्रोथचा 24.18, तर रेग्युलर ग्रोथ म्युच्युअल फंडाचा 23.36% रिटर्न

नवी दिल्ली : गेल्या एका वर्षात बँकिंग म्युच्युअल फंडाने सर्वात जास्त परतावा दिला आहे. म्युच्युअल फंडाच्या इक्विटी श्रेणीत ईएलएलएस, बँकिंग, लार्ज अँड मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये बँकिंग क्षेत्र रिटर्न चार्टमध्ये अव्वल आहे. सेक्टोरल बँकिंगने ३०% परतावा दिला. टाटा बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस डायरेक्ट ग्रोथने ३०.५१% चा परतावा दिला. यानंतर इक्विटी श्रेणीत ईएलएसएसचा क्रमांक येतो. या विभागात एसबीआय टॅक्स अॅडव्हान्टेज सिरीज ३ डायरेक्ट ग्रोथने या वर्षी २४.१८% चा परतावा दिला. लार्ज अँड मिड कॅप आणि स्मॉल कॅपनेही १६% ते २०% परतावा दिला.

बँकिंग क्षेत्रात सुधारणेचे संकेत

दुसऱ्या तिमाहीत पीएसयू बँक समभागांनी चांगली कामगिरी केली. खासगी बँक व वित्त क्षेत्रानेही सकारात्मक परतावा दिला आहे. तज्ञांनुसार, गेल्या काही दिवसांत सरकारच्या बँकांचे फेरभांडवल व विलीनीकरणाचा सकारात्मक परिणाम झाला आहे. सरकारच्या या निर्णयाने बँकांचे कामकाज चांगले झाले आणि पतवृद्धीला पाठबळ मिळेल. हा गेल्या काही महिन्यांत मुद्दा राहिला होता. विलीनीकरणानंतर व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. बँक एनपीए सुधारतील. यामुळे आगामी दिवसांत चांगल्या बँकिंग समभागात तेजी दिसू शकते. तिमाही निकालातून स्पष्ट होते की, बँका बॅड असेट्स चांगल्या करण्यात गुंतल्या आहेत.

सेक्टोरल बँकिंग: टॉप परफॉर्मर म्युच्युअल फंड : फंडाचे नाव आणि रिटर्न

 • टाटा बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस डायरेक्ट ग्रोथ - 30.51
 • सुंदरम फायना. सर्व्हिसेस अपॉर्च्युनिटी फंड डायरेक्ट ग्रोथ - 29.80
 • टॉरस बँकिंग अँड फायनांशियल सर्व्हिसेस फंड डायरेक्ट ग्रोथ - 28.57
 • बडोदा बँकिंग अँड फायनांशियल सर्व्हिसेस डायरेक्ट ग्रोथ - 26.46
 • एसबीआय बँकिंग अँड फायनांशियल सर्व्हिसेस डायरेक्ट ग्रोथ - 24.20

ईएलएलएस: टॉप परफॉर्मर म्युच्युअल फंड : फंडाचे नाव आणि रिटर्न

 • एसबीआय टॅक्स अॅडव्हान्टेज सीरीज III डायरेक्ट ग्रोथ - 24.18
 • एसबीआय टॅक्स अॅडव्हान्टेज सीरीज III रेग्युलर ग्रोथ - 23.36
 • स्टेट बँक ऑफ इंडिया टॅक्स अॅडव्हान्टेज सीरीज II ग्रोथ - 19.63
 • बँक ऑफ इंडिया एएक्सए टॅक्स अॅडव्हान्टेज डायरेक्ट ग्रोथ - 17.74
 • बीएनपी परिबस लॉन्ग टर्म इक्विटी डायरेक्ट ग्रोथ - 17.61

लार्ज अँड मिड कॅपचे टॉप परफॉर्मर : फंडाचे नाव आणि रिटर्न

 • अॅक्सिस ग्रोथ अपॉरच्युनिटीज फंड डायरेक्ट ग्रोथ - 20.14
 • अॅक्सिस ग्रोथ अपॉरच्युनिटीज फंड रेगुलर ग्रोथ - 18.03
 • मिराई अॅसेट इमर्जिंग ब्लूचिप डायरेक्ट ग्रोथ - 16.70
 • टाटा लार्ज अँड मिड कॅप डायरेक्ट ग्रोथ - 16.55
 • मिराई एसेट इमर्जिंग ब्लूचिप रेग्युलर ग्रोथ - 15.48

स्मॉल कॅप: चांगला परतावा देणारे : फंडाचे नाव आणि रिटर्न

 • अॅक्सिस स्मॉल कॅप डायरेक्ट ग्रोथ - 20.45
 • अॅक्सिस स्मॉल कॅप रेग्युलर ग्रोथ - 19.00
 • आयसीआयसीआय प्रू. स्मॉलकॅप डायरेक्ट ग्रोथ - 11.27
 • आयसीआयसीआय प्रू. स्मॉलकॅप ग्रोथ - 10.00
 • एसबीआय स्मॉल कॅप ग्रोथ - 7.42

२०१९ मध्ये एएमयूमध्ये ४.२ कोटींची वाढ

एमएफ कंपन्यांच्या एयूएममध्ये या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये ४ लाख कोटी रुपयांची मोठी वाढ झाली. कर्ज आधारित योजनांमध्ये मोठ्या गुंतवणुकीमुळे २०१९ म्युच्युअल फंड उद्योगासाठी चांगले वर्ष सिद्ध झाले. अॅम्फीचे एन.एस. व्यंकटेश म्हणाले, २०२० मध्ये हा उद्योग १७ ते १८ टक्के दराने वाढ नोंदवेल. अॅम्फीनुसार, एमएफ कंपन्यांच्या व्यवस्थापनानुसार, संपत्ती वा एयूएम २०१९ मध्ये १८% म्हणजे ४.२ लाख कोटी रु. वाढून नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत २७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

सतत सातव्या वर्षी एमएफ उद्योगाचा एयूएम वाढला

डिसेंबर २०१८ च्या अखेरीस एमएफ कंपन्यांचा एयूएम २२.८६ लाख कोटी होता. एमएफचा एयूएम वाढणे हे २०१९ सातवे वर्ष आहे. नोव्हेंबर, २००९ मध्ये उद्योगाचा एयूएम ८.२२ लाख कोटी रु. होता. जो नोव्हेंबर २०१९ पर्यंत २७ लाख कोटी रुपये झाला. दहा वर्षांत एयूएम तिप्पट झाला. या वर्षी इक्विटीशी संबंधित योजनांत गुंतवणुकीचा प्रवाह ७०,००० कोटी रुपये राहिला. हा गेल्या वर्षाच्या १.३ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत खूप कमी आहे.
 

बातम्या आणखी आहेत...