आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुजफ्फरपूर (बिहार) - शहराच्या एका हॉटेलमध्ये मंगळवारी छापेमारी करत पोलिसांनी एका रॅकेटचा भंडाफोड केला आहे. हॉटेलच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये 4 तरुण 4 विद्यार्थिनींसह आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. पोलिसांनी चारही युवकांना अटक केली आहे. तर विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावून महिला पोलिसांकडून काउन्सेलिंग करण्यात आली. असे सांगण्यात येत आहे की, चारही विद्यार्थिनी घरातून कॉलेजसाठी निघाल्या होत्या आणि मित्रांसोबत हॉटेलमध्ये पोहोचल्या. तेथे एकाचा आधी बर्थ डे साजरा केला आणि मग आपापल्या जोड्या बनवून एका खोलीत निघून गेल्या. पोलिसांनी जेव्हा हॉटेलमध्ये छापेमारी केली तेव्हा एका जोडप्याच्या अंगावर कपडेही नव्हते. धक्का देऊन दार उघडण्यात आले आणि त्यांना कपडे घालायला लावून बाहेर आणण्यात आले. खोल्यांमध्ये शक्तिवर्धक औषधेही आढळली आहेत.
पूर्वीही शहराच्या हॉटेल्समध्ये पकडण्यात आले आहेत असे रॅकेट्स...
पोलिसांनी हॉटेल मॅनेजरला अटक केली आहे. हॉटेलचा मालक हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. डीएसपी मुकुल रंजन म्हणाले की, हॉटेल मालक, मॅनेजर आणि तरुणांवर गुन्हा नोंदवून विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पती-पत्नी असल्याचे सांगून काही तासांसाठी 800 रुपयांत बुक केल्या रूम्स...
डीएसपी मुकुल रंजन म्हणाले- 4 तरुणांमध्ये दोन मुजफ्फरपुर, एक बेतिया आणि एक पाटण्याचा आहे. हॉटेलच्या मॅनेजरने सांगितले की, नेहमीच तरुण-तरुणींचे जोडपे येतात. 800 रुपयांत 24 तासांसाठी रूम बुक करतात. परंतु काही तासांनीच ते माघारी जातात. या चार जोड्यांनीही स्वत:ला पती-पत्नी असल्याचे सांगून रूम बुक केल्या होत्या. मात्र, रंगेहाथ पकडण्यात आल्यावर स्वत:ला कॉलेज स्टुडंट असल्याचे सांगू लागले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.