आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसस्टँडवर 40 मिनिटे चालला गोळीबाराचा थरार, बसची काच फोडून एकाची केली हत्या; एनकाउंटरचा video आला समोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहार : शनिवारी मुजफ्फरपूरचे बैरिया बस स्टँड गोळ्यांच्या आवाजाने हादरले होते. या घटनेत हल्लेखोरांनी एका ट्रान्सपोर्टरची गोळी घालून हत्या केली. यानंतर पोलिस आणि गुन्हेगारांमध्ये 40 मिनिटे गोळीबार चालला. या चमकमकीत दोन्हीकडून 50 हून अधिक राउंडची फायरिंग झाली होती. या गोळीबारात सीतामढीच्या परसौनी येथील आरापी रोहित कुमारला कंठस्नान घालण्यात आले. तर दोन जण फरार होण्यात यशस्वी झाले. 

 

 

मुजफ्फरपूरचे SSP मनोज कुमार यांनी सांगितले की. या चकमकीत एका गुन्हेगाराला ठार केले आहे. जुन्या वादातून ट्रान्सपोर्टरची हत्या करण्यात आली. मृतक कुंदनवर अनेक खटले दाखल होते. या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. तर नागेंद्र कुमार, राज कुमार सिंग आणि सुनील कुमार हे एसटीएफचे तीन जवान एकच गदारोळ उडाल्यानंतर गंभीररित्या जखमी झाले. आरोपींकडून एक पिस्टल आणि दोन गुप्ती जप्त करण्यात आली आहे. पोलिसांना घटनास्थळावर पिस्टल आणि एके-47चे डझनभर काडतूस ताब्यात घेतले आहे. 

बातम्या आणखी आहेत...