आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Congress कडून निवडणूक लढणार होतो, म्हणूनच अडकवले; मुजफ्फरपूर प्रकरणातील मुख्य आरोपीचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फरपूर - बालिका गृहातील अल्पवयीन मुलींच्या शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूरला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्ट परिसरात बृजेशवर खासदार पप्पू यादवांच्या महिला कार्यकर्त्यांनी शाई फेकली. मीडियाशी संवाद साधताना ठाकूर म्हणाला, मी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार होतो. त्यामुळेच, मला अडकवले जात आहे. सोबतच समाज कल्याण मंत्री मंजू वर्मा यांचे पती चंद्रशेखर वर्मा यांच्याशी आपला काहीच संबंध नाही. आपण त्यांच्याशी फक्त फोनवर राजकीय विषयांवर चर्चा झाली. सोबतच, एकही मुलीने चौकशीत माझे नाव घेतले नाही असा दावा त्याने केला आहे. चंद्रशेखरला या प्रकरणात सह-आरोपी आहे. प्रकरण समोर आले तेव्हापासून तो बेपत्ता झाला. 

 

 

मंजू वर्माच्या पतीच्या संपर्कात होता ब्रजेश
या प्रकरणात आपले नाव येत असल्याचे पाहता मंजू वर्मा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पोलिसांनी आरोपी ब्रजेशचे कॉल रेकॉर्ड काढले आहेत. त्यामध्ये ब्रजेश आणि चंद्रशेखर सलग एकमेकांच्या संपर्कात होते असे समोर आले आहे. जानेवारी ते मे महिन्यापर्यंत 5 महिन्यांत त्यांनी एकमेकांना 17 वेळा फोन केला होता. या दरम्यान दोघांच्या भेटी सुद्धा झाल्या. ब्रजेश आणि चंद्रशेखर हे एकत्रितरित्या दिल्ली टूरला जात होते असेही समोर आले आहे. 


नितीश कुमार, ब्रजेश यांच्यात घनिष्ठ संबंध - RJD
राष्ट्रीय जनता दल प्रवक्ते वीरेंद्र यांनी सांगितल्याप्रमाणे, ब्रजेशच्या मुलाच्या वाढदिवशी नितीश कुमार येणार नाही तोपर्यंत केक कापला जात नाही. या दोघांमध्ये अतिशय जवळचे संबंध होते. नितीश कुमार यांचे उत्तर बिहारची सर्वच कामे ब्रजेश करायचा. एवढेच नव्हे, तर नितीश यांचे उत्तर बिहारमधील सर्व कार्यक्रम हाच आयोजित करत होता. तर दुसरीकडे काँग्रेस नेते प्रेमचंद मिश्रा यांनी ब्रजेशचा दावा हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. नितीश आणि सुशील मोदी यांच्याकडून दबाव वाढत असल्याने तो काँग्रेसचे नाव घेत आहे असे मिश्रा म्हणाले. यानंतर जदयूने सुद्धा ब्रजेशसोबत आपला काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...