• Home
  • National
  • Other State
  • Muzaffarpur shelter home case: girls forced to dance and physically assaulted by guests as CBI chargesheet, know about accused

मुजफ्फरपूर शेल्टर होम / मुजफ्फरपूर शेल्टर होम कांड : 34 मुलींचे आयुष्य नरक बनवणाऱ्या प्रत्येकाकडे होते 'खास' काम, वाचा 12 आरोपींच्या घृणास्पद कृत्यांचे चकित करणारे सत्य

दिव्य मराठी वेब टीम

Feb 08,2019 12:03:00 AM IST

मुजफ्फरपूर (बिहार) - मुजफ्फरपूर शेल्टर होम कांड प्रकरणी CBI ने गतवर्षी 19 डिसेंबर रोजी 21 आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल केली होती. यातून अनेक चकित करणारे खुलासे झाले होते. शेल्टर होममधून जप्त करण्यात आलेल्या करड्या रंगाचे बेडशीट व कपड्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली तेव्हात्यावर वीर्य अन् रक्ताचे डाग आढळले. चार्जशीटनुसार, या गुन्ह्यात एक पूर्ण नेक्सस काम करत होते. प्रत्येकाकडे खास काम अन् जबाबदारी होती. चार्जशीटमध्ये शेल्टर होम संचालक ब्रजेश ठाकूर याला मास्टरमाइंड सांगण्यात आले होते.

34 मुलींचे आयुष्य नरक बनवणाऱ्या 12 आरोपींच्या घृणास्पद कृत्यांचे चकित करणारे हे सत्य...


1. ब्रजेश ठाकूर : शेल्टर होमचा संचालक ब्रजेश ठाकूर होता. त्याच्यावर 29 मुलींनी लैंगिक शोषण, बलात्कार आणि मारहाणीसहित इतर छळाचे आरोप ठेवले. काही म्हणाल्या की, ब्रजेशने शेल्टर होमच्या तीन मुलींची हत्यासुद्धा केली होती.

2. शाइस्ता परवीन ऊर्फ मधु : ब्रजेशची राजदार. सेवा संकल्प एवं विकास समितीच्या कामांना मॅनेज करायची. मुलींना सेक्सचे शिक्षण अन् धमक्या द्यायची. नकार देणाऱ्या मुलींना मिठाची चपाती खायला भाग पाडायची.

3. दिलीप वर्मा : बालकल्याण समितीचा अध्यक्ष. शेल्टर होममध्ये मुलींच्या काउंसलिंगच्या नावावर त्यांच्यावर बलात्कार करायचा. ब्रजेशच्या सर्व घृणास्पद कृत्यांमध्ये सहभागी होता.

4. रोझी राणी : बाल संरक्षण संस्थेची सहायक संचालक, नेहमीच शेल्टर होममध्ये जायची. मुली जेव्हा लैंगिक शोषण, बलात्कार व छळाची तक्रार करायच्या, तेव्हा ती प्रकरणे दाबून टाकायची.

5. रवी रौशन : जिल्हा बाल संरक्षण पदाधिकारी होता. मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी होती. यानेही ब्रजेश, दिलीप वर्मा, गुड्डू इत्यादी आरोपींप्रमाणे मुलींवर बलात्कार केला.

6. रामाशंकर सिंह ऊर्फ मास्टर साहब : 'प्रात: कमल' वृत्तपत्र आणि ब्रजेशच्या हॉटेलचा मॅनेजर, ब्रजेशसोबत हासुद्धा मुलींच्या लैंगिक हिंसाचारात सहभागी होता. मुलींना मारहाण करायचा आणि वाईट नजर ठेवायचा. लैंगिक शोषणही करायचा.

7. डॉ. अश्विनी कुमार : मुलींना गुंगीचे इंजेक्शन्स द्यायचा. दारू आणून रात्री मुलींना डान्स करायला लावून कुकृत्य करायचा.

8. विक्की : ब्रजेशची राजदार मधुचा पुतण्या. हा रात्री शेल्टर होमला जाऊन मुलींचे लैंगिक शोषण करायचा.

9. इंदू कुमारी : शेल्टर होमची अधीक्षिका होती. मुलींचा आरोप आहे की, ती त्यांना होमोसेक्ससाठी मजबूर करायची. रेपची तक्रार करणाऱ्या मुलींना बेदम मारहाण करायची.

10. मीनू देवी : शेल्टर होममध्ये गृह माता होती. मुलींना घरासारखे वातावरण देण्याची जबाबदारी हिच्यावर होती. परंतु ती त्यांना नशेची औषधे द्यायची. यामुळे मुलींना रात्री झालेल्या बलात्काराबद्दल सकाळी कळायचे.

11. नेहा कुमारी : शेल्टर होममध्ये नर्सच्या पदावर कार्यरत होती. मुलींना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करायची. बलात्काऱ्यांना पुरेपूर सहकार्य करायची.

12. किरण कुमारी : शेल्टर होममध्ये हेल्पर होती. हिचे काम गृहमातेची मदत करण्याचे होते. मुलींनी हिच्यावर लैंगिक छळ आणि मारहाणीचा आरोप केला. बलात्कारासाठी मुलींना बळजबरी खोल्यांमध्ये ढकलत होती.

X
COMMENT