आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्डिले मंत्री व्हावेत यासाठी माझेही प्रयत्न राहतील : रावसाहेब दानवे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- आमदार शिवाजी कर्डिले मंत्री व्हावेत, त्यांच्या नावाला माझा विरोध असण्याचे काहीच कारण नाही, उलट त्यांच्या मंत्रिपदासाठी माझेही प्रयत्न राहतील, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. 


दानवे यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, अक्षय कर्डिले, शिवाजी चव्हाण, नंदकुमार लोखंडे, खळेकर महाराज, काशिनाथ खुळे, प्रभाकर हरिश्चंद्रे आदी या वेळी उपस्थित होते. 


दानवे म्हणाले, भाजपकडे विकासाचा अजेंडा आहे. विकासाच्या मुद्यावर पक्षाने निवडणुका जिंकल्या आहेत. आगामी निवडणुकीतही विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडणुका लढवणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात जे मंत्रिपदाबाबत निर्णय घेतील, त्यांच्याकडे कर्डिले यांच्या नावाची सूचना माझ्याकडून दिली जाईल. कर्डिले यांच्याविषयी सहानुभूती, आत्मियता असल्यामुळेच ते ३५ वर्षांपासून राजकारणात आहेत. आगामी निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीने जिंकली नाही, तर पुन्हा ४० वर्षे आपण सत्तेत येऊ शकणार नाही, असे त्यांना वाटते, असेही दानवे म्हणाले. 


साहेबांना वाटेल यासाठीच मला बोलावले का ? 
भाषणात प्रास्ताविक करताना एका कार्यकर्त्याने आमदार शिवाजी कर्डिले यांना मंत्रिमंडळात घ्यावे, अशी मागणी केली. त्यावर कर्डिले म्हणाले, साहेबांना वाटेल यासाठीच मला बोलवले का? असा त्यांचा गैरसमज होईल, असे दानवे यांनी मिश्किलपणे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...