आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • My Financial Advisor: Choosing A Tax Deductible Savings Plan, Divyamarathi Column

माझा आर्थिक सल्लागार: करसवलत पात्र बचत योजनेची निवड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिशेब वर्ष २०१८- १९ मधील एका विशेष तरतुदीविषयी बऱ्याच जणांचा गैरसमज आहे

अरुण कुकडे
arunvkukde@gmail.co
m


अखेरच्या तिमाहीत करावयाच्या करसवलत पात्र बचतीची रक्कम काढली की अशी गुंतवणूक कशी, कुठे करावी हे पाहावे. आधी इतकीच बचत करायची असेल, तर फारसा प्रश्न नसतो. पण, अधिक बचत आवश्यक असेल, तर त्याबाबत सजगता बाळगणे गरजेचे असते.

एकूण अपेक्षित उत्पन्न, उपलब्ध व लागू सवलती, करसवलत पात्र गुंतवणूक आणि भरावयाचा आयकर यांचा नऊमाही आढावा घेऊन पुढील तीन महिन्यांतील अपेक्षित उत्पन्न, करसवलत पात्र गुंतवणूक यांचा अंदाज बांधला, की एकूण भरावयाच्या आयकराचे चित्र स्पष्ट होते. आपल्याला आयकर भरावा लागतो, कारण आपल्याला करपात्र उत्पन्न आहे, याचे समाधान मानावे. उगीच वाईट वाटून घेऊ नये. आयकर जेवढा आहे तेवढाच भरण्याची काळजी घ्यावी. जास्त भरल्यास इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यावर रिफंड मिळतो, पण त्यात वेळ जातो. रक्कम काही काळ व्याजाविना अडकून पडते. याउलट कमी आयकर भरला, तर रिटर्न भरताना सेल्फ असेसमेंट करून, कमी भरलेली आयकर रक्कम भरणा करता येते. पण, ही कमी भरलेली रक्कम, एकूण भरावयाच्या आयकर रकमेच्या १० टक्क्याहून जास्त असता कामा नये, अन्यथा दंडव्याज लागते.

हिशेब वर्ष २०१८- १९ मधील एका विशेष तरतुदीविषयी बऱ्याच जणांचा गैरसमज आहे, तो म्हणजे ५ लाखापर्यंतचे उत्पन्न करपात्र नाही किंवा ५ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही. ही ५ लाखापर्यंत करमाफी फक्त अति ज्येष्ठ म्हणजे ८० वर्षाच्या नागरिकांना आहे, हे लक्षात घ्यावे. ६० वर्षाखालील नागरिकांना अडीच लाख आणि ६० वर्षावरील नागरिकांना ३ लाखापर्यंत कर नाही. ज्यांचे एकूण कर देय किंवा करपात्र उत्पन्न ५ लाखांपर्यंत आहे, त्यांना कर द्यावा लागणार नाही. पण, ५ लाखाच्यावर करपात्र उत्पन्न झाले की, २.५० लाख व ३ लाख ते ५ लाख या रकमेवरील आयकर भरावा लागेल!

एकदा आपण करपात्र उत्पन्नाचा हिशेब केला, की आपल्याला लागू असलेल्या साऱ्या सवलती आपण लक्षात घेतल्या आहेत, याची खात्री करावी. या वर्षी दोन सवलत तरतुदी लागू आहेत. आपण नोकरी करीत असू तर स्टँडर्ड डिडक्शनची ४० हजार रुपयांची सवलत आहे. याचा अर्थ एकूण उत्पन्नातून ४० हजाराची वजावट आहे, त्यावर कर नाही. दुसरी तरतूद बँकांकडून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर ५० हजारांपर्यंत करमाफीची आहे. याचा अर्थ आपल्या एकूण व्याज उत्पन्न प्राप्तीतील ५० हजारांवर कर नाही. याशिवाय, आपण गृहकर्ज घेतले, तर त्यावरील व्याज एकूण १. ५० लाखांपर्यंत करमाफीस पात्र आहे. मुख्य म्हणजे, मुद्दलात केलेली परतफेड २ लाख रकमेपर्यंत असल्यास त्यावर कर नाही. या व अशा सवलती आयकराची रक्कम मोठ्या प्रमाणांत कमी करतात.

या तिमाहीत करावयाच्या करसवलत पात्र बचतीची रक्कम काढली की गुंतवणूक कशी व कुठे करावी, याचा विचार व हिशेब करावा. नऊ महिने केली इतकीच बचत करायची असेल, तर फारसा प्रश्न नसतो. पण, अधिक बचत आवश्यक असेल तर त्याबाबत सजगता बाळगणे गरजेचे असते. बँकेत ठेव ठेवली किंवा 'एनएससी'त गुंतवली तर तिच्यावरील व्याजावर कर आहे व रक्कम ५ वर्षे ठेवावी लागते. तीच रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली तर लॉकिंग पिरियड ३ वर्षे आहे व डिव्हीडंडवर कर नाही. आपले 'पीपीएफ'चे खाते असेल तर सहा वर्षानंतर ५० टक्के रक्कम काढता येईल. त्याच्या व्याजावर आयकर नाही. आपले उत्पन्न, आपल्याजवळील उपलब्ध रक्कम व भविष्यकाळातील गरज, याचा विचार करून गुंतवणूक करावी. आपल्या एकूणच बचत धोरणानुसार, आता करावयाची वाढीव बचत योग्य त्या योजनेत करावी. या वर्षीच्या देय कराचा विचार करीत जास्तीत जास्त लाभदायी योजनेत गुंतवणूक करावी. आपण चालू आर्थिक वर्षातील कर व गुंतवणुकीवर विचार करीत असतानाच आगामी वर्षाच्या बजेटचे पडघम वाजायला लागले आहेत. पुढच्या वर्षी बऱ्याच करसवलती मिळण्याच्या सुवार्ता येत आहेत. त्यांचाही व्यवस्थित व परिपूर्ण विचार करण्यास सिध्द होऊ या!

लेखकाचा संपर्क : 9225147079

बातम्या आणखी आहेत...