आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झीसोबत खूप चांगले संबंध आणि ऋणानुबंध आहेत म्हणून ही भूमिका स्वीकारली - अभिनेते अभिजित चव्हाण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'साजणा' या मालिकेतील रावसाहेबांची भूमिका प्रेक्षकांच्या आवडीची ठरू लागली आहे. ही भूमिका साकारणारे दमदार अभिनेते अभिजित चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद;

'साजणा' स्वीकारण्याचे कारण काय?
झीसोबत खूप चांगले संबंध आणि ऋणानुबंध आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय निर्माते शशांक सोळंकी आणि सेव्हन सेन्स मीडियासोबतसुद्धा अनेकवेळा काम केलेले आहे. त्यामुळे मी हा कार्यक्रम स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

भूमिकेविषयी काय सांगाल?
आमदार रावसाहेब जाधव यांची भूमिका मी मालिकेत करत आहे. स्वतःचा शब्द हाच शेवटचा शब्द असे म्हणणारे आणि त्याप्रमाणे वागणारे असे हे व्यक्तिमत्व आहे. कावेबाज स्वभावाचा हा माणूस घरात सुद्धा सर्रासपणे राजकारण करतो. आपल्या एखाद्या इच्छेसाठी रावसाहेब साऱ्या घराला वेठीस धरू शकतात. 

उद्दाम आणि उर्मट असे हे पात्र आहे. सहकलाकारांसोबत कामचा अनुभव कसा आहे?
सगळ्याच सहकलाकारांसोबत मी पहिल्यांदाच काम करत आहे. पण सगळ्यांसोबत काम करताना खूपच मजा येते. सारे सहकलाकार, ही केवळ एक टीम नसून ते एक कुटुंब झालेले आहे. अगदी जेवायला सुद्धा आम्ही सगळे सोबतच बसतो.
 

बातम्या आणखी आहेत...