आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस 12 / घरातून बाहेर पडल्यानंतर अनूप जलोटा म्हणाले-जसलीनसोबतचे माझे नाते शारीरिक नसून आध्यात्मिक आहेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही डेस्कः प्रसिद्ध भजन गायक अनूप जलोटा आणि जसलीन मथारु बिग बॉस 12 ची सर्वात चर्चेत राहिलेली जोडी आहे. आता ही जोडी तुटली आहे, कारण अनूप जलोटा रविवारी बिग बॉसच्या घरातून बेघर झाले आहेत. त्यांच्यासोबच कॉमन सदस्य सबा खानही घराबाहेर झाली आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर अनूपयांनी दैनिकभास्करसोबत खास बातचित केली असून यामध्ये त्यांनी घरातील अनूभव आणि जसलीनसोबतच्या नात्याविषयी सांगितले.
 
शोचा अनूभव शानदार राहिला...
अनूप यांनी सांगितले, शोचा एकुणच अनूभव अतिशय चांगला राहिला. मी शोमध्ये जाण्यापूर्वी दिवसरात्र काम करत होतो, या शोने मला तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ दिला. शोमध्ये येण्यापूर्वीपर्यंत मी आठ तासांची पुरेपुर झोप घेतलेली मला आठवत नाहीये. मी आता चार किलो वजनदेखील कमी केले आहे. मला वाटतं की, जर मी अजून काही काळ या शोमध्ये राहिलो असतो, तर नक्कीच सलमानला रिप्लेस करु शकलो असतो. (हसून) 
 
पुढील 15 दिवस एकही कॉन्सर्ट प्लान करणार नाहीये...
आगामी कार्यक्रमांविषयी बोलताना अनूप म्हणाले, होय बरेच कॉन्सर्ट प्लानिंगमध्ये आहेत. पण शोमधून बाहेर पडणे प्लान्ड नव्हते. सध्या सर्व कॉन्सर्ट  मी पोस्टपोन केले आहेत. आता घरातून बाहेर आलोय, त्यामुळे पुढचे 15 दिवस मी माझ्या घरीच राहणार आहे. 15 दिवस एकही शो करणार नाहीये.
 
जसलीनसोबतचे माझे नाते शारीरिक नाही...
जसलीनसोबतच्या नात्याविषयी बोलताना अनूप म्हणाले, जसलीनसोबतचे माझे नाते पवित्र आणि संगीतात्मक आहे. हे प्रेमापलीकडील नाते आहे. याला शब्दांत व्यक्त करु शकत नाही. माझे तिच्यासोबतचे नाते हे शारीरिक नसून आध्यात्मिक आहे. आम्ही एकमेकांच्या घरी फार कमी वेळा गेलो आहोत. या शोच्या माध्यमातून आम्हाला बराच वेळ एकत्र घालवता आला. येथे आमचे बाँडिंग अधिक स्ट्राँग झाले आहे. आशा करतो, की हे बाँडिंग कायम असेच राहिल. समाज आमच्या नात्याला स्वीकारणार नाही, हे मला ठाऊक आहे. पण हे नाते फक्त मी आणि जसलीनच समजू शकतो. जसलीनचे वडील आणि माझे कुटुंबीय या नात्याने आनंदी नाहीते, हे मला माहित आहे. पण मी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करणार आहे. विश्वास आहे की, त्यांना आमचे नाते मान्य होईल.
 
रोमिल शोचा विजेता व्हावा...
शोच्या विजेतेपदासाठी योग्य सदस्य कोण, याविषयी अनूप यांना विचारले असता, ते म्हणाले, रोमिलने शो जिंकावा, कारण तो अतिशय स्मार्ट आहे. वकील असल्यामुळे तो अतिशय शार्प आहे. त्याला हा खेळ अगदी चांगला समजला आहे. शोमधील नवी एन्ट्री करणारी मेघा धाडे एंटरटेनिंग आहे. पण वाइल्ड कार्ड एन्ट्री असलेल्या सदस्याला शोचे टायटल जिंकण्याची संधी मिळेल की नाही याविषयी मी श्योअर नाही. 

बातम्या आणखी आहेत...