आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझी चपातीचोरी...!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1962 मध्ये मी इयत्ता पाचवीमध्ये असतानाची गोष्ट. आमच्या गावी इयत्ता चौथीपर्यंतच शाळा होती. पाचवी ते सातवीसाठी शेजारील आठवाड (जि. नगर) या गावी जावे लागायचे. आमची घरची परिस्थिती बेताचीच असल्याने फक्त सणावाराला गव्हाची पोळी आम्हाला मिळत असे. शाळेतील जेवणाच्या मधल्या सुटीत आम्ही सर्वजण नदीवर जेवणासाठी जात होतो. आमच्याबरोबर अंभोरा, नांदूर व इतर ठिकाणचीही मुले असत. घनदाट आमराई, खळाळत्या वाहत्या नद्या... एकंदर रमणीय वातावरण. जेवताना आम्ही सर्वजण गोलाकार बसायचो. अंभोरा येथील एका दुकानदाराचा मुलगाही आमच्याबरोबर जेवत असे. आम्हा सर्वांच्या ज्वारी-बाजरीच्या भाकरी असत. फक्त पन्नालालच्या डब्यात मऊशार पोळ्या असत. त्याच्या चपात्या इतरांबरोबरच मलाही आकर्षित करीत. एके दिवशी जेवणाच्या आधीच सुरपारंब्याचा डाव रंगला. कोणी झाडावर, कोणी नदीवर, कोणी सूर आणण्यात व्यग्र, तर क ोणी पाड शोधण्यात व्यग्र.

चपाती खाण्याचा मोह मला आवरता आला नाही. सर्वांच्या नजरा चुकवून मी हळूच एक चपाती त्याच्या डब्यातून काढली आणि कोरडीच गट्टम केली. खाताना फार मजा वाटली, पण सर्वजण जेव्हा एकत्र जेवायला बसलो तेव्हा मला अपराध्यासारखे वाटू लागले. डब्यात एक चपाती कमी आहे हे त्याच्या लक्षात आले की नाही मला माहिती नाही, पण बिचा-या पन्नालालने एका शब्दानेही या गोष्टीची वाच्यता केली नाही. कदाचित जेवताना खेळाच्या गप्पात रंगल्याने त्याच्या लक्षातही आले नसावे. पण मला मात्र राहून राहून चपाती चोरल्याची जाणीव होत होती. मला अपराध्यासारखे वाटत होते. माझ्या चोरीची कोणालाच कल्पना आली नव्हती, पण माझे मन एकदम अस्वस्थ झाले होते. एक दा पन्नालाल आणि सवंगड्यांना मी चपाती चोरून खाल्ली हे सांगावेसे वाटत होते, पण ते सर्वजण काय म्हणतील या भीतीने मी वाच्यता केली नाही.