Home | International | Other Country | myanmar jails 2 Reuters reporters for investigating rohingya genocide

Reuters च्या 2 पत्रकारांना प्रत्येकी 7-7 वर्षांची कैद, म्यानमारमध्ये Rohingya मुस्लिमांचे कव्हरेज करण्याची मिळाली शिक्षा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 03, 2018, 11:14 AM IST

दोन्ही पत्रकारांनी रोहिंग्या मुस्लिम बहुल रेखीन प्रांतात सुरू असलेल्या नरसंहारावर स्टिंग ऑपरेशन केले होते.

 • myanmar jails 2 Reuters reporters for investigating rohingya genocide

  नेपीतॉ - म्यानमारमध्ये रॉयटर्स वृत्तसंस्थेसाठी काम करणाऱ्या दोन पत्रकारांना प्रत्येकी 7-7 वर्षांची कैद सुनावण्यात आली आहे. वा लोन (32) आणि क्याव सो यू (28) यांनी म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांचे कव्हरेज करताना कायद्यांचे उल्लंघन केले आहे. त्यांच्या रिपोर्टिंगमुळे म्यानमारची सुरक्षा आणि गुप्तता यांचा भंग झाल्याने ही शिक्षा सुनावली जात आहे असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. म्यानमार न्यायालयाच्या या निकालावर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. कोर्टाचा निर्णय हा पत्रकारिता आणि माध्यम स्वातंत्र्यावर हल्ला आहे असे म्हटले जात आहे.


  काय म्हणाले पत्रकार..?
  वा आणि क्याव या दोघांना डिसेंबर 2017 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी दोन्ही पत्रकारांनी रोहिंग्या मुस्लिम बहुल रेखीन प्रांतात सुरू असलेल्या नरसंहारावर स्टिंग ऑपरेशन केले होते. निकाल लागल्यानंतर क्याव म्हणाले, "कोर्टाने दिलेल्या निकालावर आम्हाला मुळीच आश्चर्य नाही. आम्ही काहीही चूक केली नाही.'' रॉयटर्सचे मुख्य संपादक स्टीफन एडलर यांनी सांगितल्याप्रमाणे, "आमच्या पत्रकारांना म्यानमारमध्ये दोषी ठरवल्याबद्दल आमची संघटना त्या दोन्ही पत्रकारांसह जगभरातील प्रेससाठी दुखी आहोत.''

  मानवाधिकार संघटनांकडून तीव्र निषेध
  ह्यूमन राइट्स वॉचचे आशियाई संचालक फिल रॉबर्टसन यांनी ट्वीट करून या शिक्षेचा तीव्र निषेध केला. "रॉयटर्सच्या 2 पत्रकारांना दोषी ठरवणे हा म्यानमारने माध्यम स्वातंत्र्यावर केलेला हल्ला आहे. शोध पत्रकारितेला म्यानमार सरकार किती घाबरते त्याचा हा पुरावा आहे.'' वा आणि क्याव यांना जुलै महिन्यातच न्यायालयाने सुरक्षा आणि गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवली होते. त्याच प्रकरणात दोघांना सोमवारी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 • myanmar jails 2 Reuters reporters for investigating rohingya genocide
 • myanmar jails 2 Reuters reporters for investigating rohingya genocide

Trending