Home | International | Other Country | Myanmar leader Suu Kyi should have resigned on rohingya crisis, says unhrc chief

स्यू की यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा, म्यानमारच्या लष्कराची नरसंहारप्रकरणी चौकशी आवश्यक; UN चे मानवाधिकार प्रमुख बरसले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 30, 2018, 02:49 PM IST

आंग सान स्यू की जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी यूएन मानवाधिकार प्रमुखांनी केली.

 • Myanmar leader Suu Kyi should have resigned on rohingya crisis, says unhrc chief

  लंडन - म्यानमारमध्ये हजारो रोहिंग्यांच्या नरसंहारासाठी आंग सान स्यू की जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी यूएनच्या मानवाधिकार प्रमुखांनी केली आहे. संयुक्त राष्ट्रने (यूएन) रोहिंग्या नरसंहारावर सोमवारीच एक अहवाल जारी करून म्यानमारच्या लष्कराविरुद्ध चौकशीची मागणी केली. त्यानंतर ब्रिटिश माध्यम बीबीसीशी संवाद साधताना यूएन मानवाधिकार प्रमुख झैद राद अल-हुसैन यांनी स्यू की यांच्या नाकर्तेपणावर आक्षेप घेतला. एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असतानाही हातावर हात ठेवून बसलेल्या नोबेल विजेत्या स्यू की यांनी लष्कराच्या प्रवक्त्या होण्याची गरज नाही असे ते पुढे म्हणाले आहेत. म्यानमारने हे आरोप आणि अहवाल दोन्ही एकतर्फी असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. ऑगस्ट 2017 पासून आतापर्यंत हजारो रोहिंग्यांचा नरसंहार झाला असून एक लाखांपेक्षा अधिक मुस्लिमांनी पलायन केले आहे.


  त्यांनी यापेक्षा नजरकैदेत राहण्याचा मार्ग निवडायला हवा...
  > बौद्ध लोकसंख्या बहुल म्यानमारच्या लष्करावर रोहिंग्या मुस्लिमांच्या जातीय नरसंहाराचे आरोप होत आहेत. सरकारकडून अभय मिळवलेल्या लष्कराने आतापर्यंत हजारो रोहिंग्या मुस्लिमांची कत्तल केली. तसेच लाखो रोहिंग्यांना देशाबाहेर हकलले. त्यावरच संयुक्त राष्ट्रने सोमवारी (27 ऑगस्ट 2018) अहवाल जारी करून म्यानमारच्या लष्कर विरोधात नरसंहाराच्या चौकशीची आवाहन केले. त्यावरच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुखांनी स्यू की यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
  > झैद राद अल-हुसैन म्हणाले, "नोबेल पुरस्कार विजेत्या 2 दशके नजरकैदेत होत्या. 2016 पासून त्या म्यानमार सरकारच्या सर्वोच्च प्रमुख आहेत. त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांना हवे असल्यास दखल त्यांनी रोहिंग्या विरोधी हिंसाचार थांबवता आला असता. स्यू की यांनी लष्कराच्या प्रवक्त्या होऊन प्रतिक्रिया देण्याची काहीच गरज नाही. लष्करावर आरोप खोटे आहेत, किंवा आरोप एकतर्फी आहे असे त्यांनी म्हणून नये. त्यांनी या प्रकरणात एक तर शांत राहायला हवे. किंवा त्याहून चांगला पर्याय म्हणून त्यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा. असा म्यानमारच्या सत्तेची धुरा मला सांभाळता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट करून माघार घ्यायला हवी होती." उल्लेखनीय बाब म्हणजे, 1989 ते 2010 पर्यंत स्यू की यांना याच लष्कराने नजरकैदेत ठेवले होते.


  हिंसाचारावर काय म्हणाल्या आंग सान स्यू की?
  - म्यानमारच्या सैनिकांकडून रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहारावर बोलताना त्या म्हणाल्या, "मुस्लिमांना लक्ष्य करून त्यांची हत्या केली जात आहे ही गोष्ट मी नकारत नाही. परंतु, हिंसाचाराचा फटका बौद्ध समुदायालाही बसला. याच भीतीमुळे हिंसाचार वाढत आहे. माध्यमांनी या हिंसाचाराला मुस्लिमांचा सफाया आणि जातीय दंगल असे म्हटले आहे. परंतु, एखाद्या विशिष्ट जात-समूहाविरोधी हिंसाचार आणि सध्या सुरू असलेल्या हिंसाचारात फरक आहे." त्यांनी लष्कराकडून होणाऱ्या नरसंहाराचे सुद्धा अप्रत्यक्ष समर्थनच केले आहे.
  - आंग सान स्यू की जगभरात शांतताप्रीय आणि लोकशाहीवादी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. 80 च्या दशकात म्यानमारच्या लष्कराने हिंसकरित्या सत्ता काबीज केली त्यावेळी त्यांनी हिंसाचार विरोधात नजरकैदेत राहण्याचा मार्ग निवडला. लोकशाही आणि अहिंसेसाठीच त्यांनी 16 वर्षे नजरकैदेत काढली. त्यासाठीच त्यांना नोबेलही मिळाला. परंतु, रोहिंग्या मुस्लिमांवर त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांनी आयुष्यभर कमावलेली प्रतिष्ठा मलीन होत असतानाचे दिसून येत आहे.

  स्यू कींचा नोबेल परत घेणार नाही - नोबेल समिती...
  1991 मध्ये स्यू की यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. म्यानमारमध्ये हिंसाचार विरोधात आणि शांततेच्या प्रयत्नांसाठी केलेल्या कामगिरीमुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. आजघडीला त्या रोहिंग्यांचे नरसंहार करणाऱ्या लष्कराच्या समर्थनात बोलत आहेत. हिंसाचारावर सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्यू की यांचे नोबेल परत घेण्यात यावे अशी मागणी उठली होती. परंतु, बुधवारीच नोबेल पुरस्कार समितीने स्यू की यांचा पुरस्कार परत घेणार नाही असे स्पष्ट केले.

 • Myanmar leader Suu Kyi should have resigned on rohingya crisis, says unhrc chief

  ऑगस्ट 2017 पासून आतापर्यंत हजारो रोहिंग्यांचा नरसंहार झाला असून एक लाखांपेक्षा अधिक मुस्लिमांनी पलायन केले आहे.

 • Myanmar leader Suu Kyi should have resigned on rohingya crisis, says unhrc chief

  संयुक्त राष्ट्रने सोमवारी (27 ऑगस्ट 2018) अहवाल जारी करून म्यानमारच्या लष्कर विरोधात नरसंहाराच्या चौकशीची आवाहन केले.

Trending