आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायलेकांनी व्यापाऱ्याला सव्वातीन लाखांना गंडवले: ताेतया पाेलिसाची घेतली मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अमळनेर येथील व्यापाऱ्याकडून घेतलेला सुगम, धनाडाळ, सिगारेट आदी ३ लाख १० हजार रुपयांचा माल सिंधी कॉलनीतील व्यापारी मायलेकांनी विकत  घेतला. त्यानंतर तोतया पोलिसाने कारवाईदरम्यान माल जप्त केल्याचा बनाव करून अमळनेरच्या व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  या प्रकरणात बुधवारी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाेलिसांनी मायलेकास अटक केली आहे.  दीपक आणि सिमरण चेतवाणी अशी  दाेघांची नावे आहेत.

 

अमळनेर येथील सिंधी कॉलनीत प्रकाश वरियलदास वासवाणी (३८) हे व्यापारी सुपारी, धनाडाळ, मीरा, सिगारेट विक्रीचा व्यवसाय करतात. जळगाव येथील व्यापारी रमेश चेतवाणी यांचे शिरसोली रस्त्यालगत खुशी पान मसाल्याचे दुकान आहे. १२ नोव्हेंबर रोजी वासवाणी व अमळनेर येथील समाधान पाटील कारमधून ३ लाख १० हजार रुपये किमतीचा माल घेऊन जळगावात आले.   


वासवाणी गाडी खाली करत असताना दुचाकीवर एक जण सिंधी काॅलनीत आला. त्याने स्वत:ची ओळख पोलिस अशी करून दिली. तो माल गुटखा असल्याचेही तो म्हणाला. मात्र, वासवाणी यांनी तो माल सुपारी, धनादाल, सिगारेट आदी असल्याचे त्याला सांगितले. तसेच ‘तो पोलिस असून ओळखीचा अाहे. तुम्ही निघून जा,’ असे सिमरण व दीपक यांनी अमळनेरच्या व्यापाऱ्याला सांगितले. त्यामुळे व्यापारी दुकानात माल टाकून तेथून निघून गेला.

 

गुन्ह्यात अडकवण्याची व्यापाऱ्याला दिली धमकी 

रात्री दीपकने व्यापाऱ्याला संपर्क करून तुम्ही घरी या, असे सांगितलेे. त्यानुसार व्यापारी चेतवाणी यांच्या घरी गेला. पोलिस माल घेऊन गेल्याचे दोघांनी व्यापाऱ्याला सांगितले. त्यामुळे व्यापाऱ्याने त्यांना दिलेल्या मालाचे पैसे मागितले. पैसे देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. तो माल गुटखा असल्याचे सांगत गुन्ह्यात अडकवून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे वासवाणी यांनी बुधवारी रात्री एमआयडीसी फिर्याद दिली. त्यानुसार दाेघांना अटक करण्यात  आली.

बातम्या आणखी आहेत...