आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोध : इजिप्तच्या समुद्रतळाशी सापडले 1200 वर्ष जुने मंदिर, चौथ्या शतकातील नाणे आणि दागिने मिळाले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खबरे जरा हटके डेस्क -  इजिप्तच्या हेराक्लिओन शहरात 1200 वर्ष जुने मंदिर सापडले. शास्त्रज्ञांच्या मते, अंदाजे एक हजार वर्षांपूर्वी मंदिरासोबत काही बोटी समुद्रात बुडाल्या होत्या. यामध्ये तांब्याच्या मुद्रा आणि इतर दागिने सापडले आहे. पाण्यात मिळालेले खांब शहराच्या मुख्य मंदिराचे आहेत. स्कॅनिंग डिव्हाइसच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला. 


हेराक्लिओनला इजिप्तचे अटलांटिस म्हणतात

> पुरातत्वशास्त्रज्ञांनुसार, इजिप्तचे अटलांटिस समजल्या जाणाऱ्या उत्तर भागात हे मंदिर सापडले आहे. तळाला अस्ताव्यस्थ पसरलेले एक ग्रीक मंदिर सापडले. मंदिराच्या खांबाव्यतिरिक्त तिसऱ्या आणि चौथ्या शतकातील मातीचे भांडे देखील सापडले आहेत. बुडालेल्या नावेतून राजा क्लाडियस टॉलमी दुसरा याच्या कार्यकाळातील तांब्याचे नाणे मिळाले. तसेच दूरवर पसरलेल्या इमारती तेथे आढळून आल्या. 


> मंदिराचा शोध घेणाऱ्या टीमला समुद्राच्या तळाशी प्राचीन शिप मिळाले आहेत. या शिपमध्ये चौथ्या दशकातील क्रॉकरी, नाणे आणि दागिन्यांनी भरलेल एक भांडे आढळून आले. टीमच्या मते, कधीकाळी हेराक्लिओनला मंदिराचे शहर म्हटल्या जात असे. त्सुनामीमुळे हे शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. हे शहर व्यापाराचे मुख्य केंद्र मानले जात होते. ते आता अबू-किर खाडी नावाने ओळखले जाते.   

 

> 12 वर्षांपूर्वी आर्कियोलॉजिस्ट डॉ. फ्रँक गोडियो यांना इजिप्तच्या किनारी प्रदेशात अठराव्या शतकातील फ्रेंच युद्धपोत मिळाले होते. डॉ. फ्रँक गोडियो यांच्या मते, चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर ते हाती लागले होते. या शहरात किती लोक वास्तव्यास होते याचा नकाशा तयार करण्यासाठी एका वर्षाहून अधिक कालावधी लागला होता. शहर स्थापन करतेवेळी पाण्याची पातळी वाढत असल्याचे मानले जाते. 

बातम्या आणखी आहेत...