आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्यासोबत शेतात फिरत होता शेतकरी, दगडासारखी दिसली रहस्यमयी वस्तू, पोलिसांना बोलावले पण त्यांनाही बसला धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ही कहाणी 'शॉकिंग डिस्कव्हरी' सिरीज अंतर्गत आहे. जगभरात अनेकदा जाणता-अजाणता असे शोध लागले आहेत, ज्यांच्या बाबत अनेकांना माहिती नसते.)

 

ब्यूनॉस आयर्स - अर्जेंटिनात राहणाऱ्या एका व्यक्तीला काही दिवसांपूर्वी आपल्या शेताजवळ एक चित्रविचित्र वस्तू आढळली होती. ही पाहून ते हैराण झाले होते. ती वस्तू पाहून लोक वेगवेगळे अंदाज लावू लागले. काहींना तो एलियन पदार्थ वाटला, तर काहींना डायनासोरचे अंडे वाटले. एवढेच नव्हे, पोलिसही ती वस्तू पाहून गोंधळून गेले. यानंतर अचानक त्या शेतकऱ्याच्या कुत्र्याने भुंकणे सुरू केले आणि पोलिसांना गडबड असल्याची जाणीव झाली. यानंतर पुरातत्त्व शास्त्रज्ञांना बोलावून त्या दगडाची तपासणी करण्यात आली. मग कळले की, ती 2 टन वजनी वस्तू खरेतर ग्लिप्टोडोंट नावाच्या प्राण्याचा जिवाश्म होती. तो तब्बल 10 हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर वास्तव्याला होता.


दगडासारखी वस्तू पाहून प्रत्येक जण हैराण
- ही घटना ब्यूनस आयर्समध्ये राहणारे एक शेतकरी जोस एंटोनियो निवेस यांची आहे. ते सन 2015 च्या क्रिसमसच्या सुट्यांमध्ये आपल्या शेताच्या आसपास फिरत होते. 
- त्यांचे शेत शहरापासून तब्बल 40 किलोमीटर दूर होते आणि त्या वेळी ते आपल्या पाळीव कुत्र्यासोबत फिरत होते. फिरता-फिरता ते आपल्या शेतापासून थोडे दूर जंगलाकडे निघून गेले.
- जंगलातून त्यांना नदीच्या किनारी दुसरीकडे माती पडून एका मोठ्या खड्ड्यात विचित्र दगड आढळला. तो दगड वेगळाच दिसत होता शिवाय त्यात एक छिद्रही होते. ते पाहून त्यांनी जवळ जाऊन सत्य जाणून घेण्याचा विचार केला.
- शेतकरी दगडाजवळ गेला, तेव्हा त्यांना कळले की, तो दगडासारखा आहे पण दगड नक्कीच नाही. ती विचित्र वस्तू चिखलात पडलेली होती. यामुळे ओळख पटवणे कठीण ठरत होते. यानंतर त्यांनी त्यावरील थोडी माती साफ केली. तेव्हा त्यांना वाटले की हे कदाचित डायनासोरचे अंडे असावे.

 
पत्नी आणि गावकऱ्यांना बोलावले
- यानंतर त्या शेतकऱ्याने आपल्या गावात जाऊन पत्नीला व इतर गावकऱ्यांना याबाबत सांगितले. तो म्हणाला की, मला एक माठे अंडे आढळले आहे, जे बिलकुल डायनासोरच्या अंड्यासारखे आहे.
- शेतकऱ्याची पत्नी आणि इतरांनी जेव्हा ते पाहिले तेव्हा त्यांना ही अंड्यासारखी वस्तू हॉलीवूड चित्रपट 'जुरासिक पार्क'च्या सेटचा भागच वाटली. तथापि, तेथे उपस्थित लोक अजूनही संभ्रमातच होते. खूप गर्दी जमा झाली होती. यानंतर शेतकऱ्याने याबाबत पोलिसांना कळवले.
- पोलिस तेथे पोहोचले, परंतु त्यांना अंड्याच्या सत्यतेबाबत कळले नाही. तेही पूर्णपणे कन्फ्यूज होते. यानंतरचे काम जोश यांच्या पाळीव कुत्र्याने केले. 

 
कुत्र्याने दिला पोलिसांना सुगावा
- पोलिसही गोंधळात होते. त्यांना पुढे काय करावे हे समजत नव्हते. तेव्हा अचानक जोस यांच्या कुत्र्याने तेथे हालचाल करत इकडे-तिकडे फिरणे सुरू केले. तो त्या जागेच्या आसपास जाऊन हुंगू लागला आणि भुंकू लागला. तेथे उपस्थित लोकांना समजले की, हा एक साधारण दगड नाही, तर काहीतरी मौल्यवान आहे.
- यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकरणी विशेषज्ञांची मदत घेण्यासाठी परिसरातील काही पुरातत्त्व शास्त्रज्ञांना बोलावले. शास्त्रज्ञांनी तेथे येऊन त्या अंड्यासारख्या दगडावरची माती हटवली. त्यांच्या अपेक्षेपेक्षा ते मोठे आणि वजनदार निघाले.
- अनेक दिवसांच्या रिसर्च, तपासणी आणि परीक्षणानंतर शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला की, तो अंड्यासारखा दगड ना डायनासोरशी जोडलेला आणि ना एलियनशी. खरेतर ती विशाल वस्तू प्रागैतिहासिक काळातील एक प्राण्याचे जीवाश्म आहे. जे खूप अवस्थेत सापडले आहे.
- तज्ज्ञांच्या मते, ती 2 टनांची दगडासारखी वस्तू विशाल ग्लिप्टोडोन नावाच्या जीवाचे कवच होते. जाणकार सांगतात की, प्रागैतिहासिक काळातील या प्राण्याचे जिवाश्म अशा प्रकारे आढळणे खूप दुर्लभ आहे आणि असे कधी-कधीच होते.
- शेतकऱ्याला मिळालेले कवच तब्बल 3 फूट लांब होते. जाणकार सांगतात, ज्या ग्लिप्टोडोनचे ते असेल तो तब्बल 11 फूट लांब राहिला असेल. ग्लिप्टोडोन प्राणी या पृथ्वीवर 10 हजार वर्षांपूर्वी आढळत होते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos व या घटनेचा Video    

बातम्या आणखी आहेत...