Home | Khabrein Jara Hat Ke | Mysterious Radio Signals Recieved From Space Ignites Debate For Aliens

साइंटिस्ट्सला अंतराळातून मिळत आहेत रहस्यमयी रेडियो तरंग, दावा: 1.5 बिलियन लाइट ईयर अंतरावर कुणी तरी आहे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 11, 2019, 03:32 PM IST

रिडिओ सिग्नल्समुळे पुन्हा सुरु झाला एलियन्सचा वाद

 • Mysterious Radio Signals Recieved From Space Ignites Debate For Aliens

  टोरंटो. कनाडाच्या खगोल वैज्ञानिकांनी दूर आकाशगंगेतून निघणा-या रहस्यमयी रेडियो सिग्नल्सचा शोध लावला आहे. जर्नल नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टनुसार फास्ट रेडिया बर्स्ट कॅच करण्यात आले आहे. एका रिडियो टेलिस्कोपच्या मदतीने हे सिग्नल पकडण्यात आले आहेत. हे सर्व संकेत एका सोर्सकडून आल्याचा दावा करण्यात आला आहे. हे सोर्स जवळपास 1.5 बिलियन लाइट ईयर (प्रकाश वर्ष) अंतरावर असल्याचे बोलले जातेय. हे सिग्नल्स पकडल्यानंतर वैज्ञानिकांमध्ये पुन्हा एकदा एलियन्सच्या अस्तित्वावर वाद सुरु झाला आहे. अनेक साइंटिस्ट्स जिद्दीवर अडले आहे की, आता ते एकटे नाही.

  हार्वर्ड स्मिथसोनियन सेंटरमधून वैज्ञानिक प्रो. एविड लोएबने सांगितले, "हे संकेत मिळणे सामान्य गोष्ट नाही. हे सिग्नल्स एखाद्या अडवान्स एलियन टेक्नोलॉजीचा पुरावा असू शकतात. ब्रिटिश कोलंबिया यूनिव्हर्सिटीनुसार गेल्यावर्षी असे 13 लहान सिग्नल्स मिळाले होते, याविषयी बोलले जात होते की, हे ब्लॅक होल सारख्या अनेक अंतरिक्ष घटनांमधून जन्म घेतलेले तरंग असू शकतात. पण आता तपासणीची दिशा बदललेली दिसतेय."


  पुढे वाचा, जेव्हा साइंटिस्ट्सला मिळाली होती एक विचित्र तरंग...

 • Mysterious Radio Signals Recieved From Space Ignites Debate For Aliens

  जे तरंग आता मिळाले ते इतरांपेक्षा वेगळे 


  - एक्सपर्ट्सने सांगितले की, गेल्या काही तरंगांमधून फक्त एकच तरंग हुबेहूब आहे. 2015 मध्ये रीकोची एरिकिबो रेडियो टेलीस्कोपने हे पकडले होते. हे एका संदेशाप्रमाणे होते. डॉ. स्टेयर्सनुसार एकसारखे एफआरबी तरंग अंतराळातून रिपीट होऊ शकत नाही. यामागे अवश्य काही तरी कारण असेल. आपण असेच काही तरंग शोधून काढायला हवे. यानंतर आपण अंतराळातील हे रहस्य अलगडू शकू. 

   

 • Mysterious Radio Signals Recieved From Space Ignites Debate For Aliens

  एलियंस खरेच आपल्या जवळ आहेत?
  - वैज्ञानिकांमध्ये अनेक दशकांपासून एलियन आहेत की, नाही यावर वाद आहे. याविषयी अनेक थेरी समोर येत असतात. आता या रिडियो सिग्नलच्या पॅर्टनने पुन्हा विचार करण्यास भाग पाडले आहे. प्रसिध्द साइंटिस्ट्स स्टीफन हॉकिंगही एलियन्सचे अस्तित्व मान्य करायचे. यामुळे आता प्रश्न उपस्थित होतो की, खरेच एलियन्स आपल्या जवळ पोहोचले आहेत का?

   

Trending