आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CICADA 3301: इंटरनेटचे रहस्य, जे सॉल्व्ह करताच लागायचा जॉब, जगातील सर्वात बुद्धिमान लोकांना एकत्र करण्याची होती तयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही कहाणी 'कॉन्ट्रोव्हर्शियल क्लेम' सिरीजवर आधारित आहे. जगभरात वेळोवेळी खरे-खोटे अनेक कॉन्ट्रोवर्शियल दावे केले जातात. अनेक दावे तर असे आहेत, जे आजही जगासाठी गूढ बनून आहेत.)

 

न्यूयॉर्क - CICADA 3301 म्हणजेच सिकाडा दिसायला एका कोडसारखा भासेल परंतु हे नाव सर्वात मोठे कोडे आहे. हे इंटरनेट जगतातील असे रहस्य आहे, जे सोडवताच लोकांना जॉब लागायचा. असे मानले जाते की, जगातील सर्वात शक्तिशाली गुप्तचर संस्था बुद्धिमान व्यक्तींचा शोध या पद्धतीने घेते. 

 

2012 मध्ये समोर आले हे कोडे...
- याची सुरुवात तेव्हापासून मानली जाते, जेव्हा 4CHAN नावाच्या एका वेबसाइटमधून एक मेसेज व्हायरल झाला होता. ज्यात लिहिण्यात आले होते की, एक एजन्सी अशा बुद्धिमान व्यक्तींचा शोध घेत आहे, जी या ‘खास कोडे’ सोडवू शकेल. 2012 मध्ये पहिले कोडे समोर आले, ज्यात काही कोड्स होते. हे कुणालाही कळण्यासारखे नव्हते. परंतु ज्यांना समजायचे होते त्यांना कळून चुकले होते.

 

पुन्हा सुरू झाले सत्र
- 2012 मध्ये काही जणांनी दावा केला की, त्यांनी हे कोडे सोडवले आहे. काही दिवसांनी अचानक हे लोक कुठेतरी निघून गेल्याचीही बाब समोर आली. यानंतर दरवर्षी सिकाडा 3301 नावाने कोडे समोर येऊ लागले. सॉफ्टवेयर इंजीनियरपासून ते अनेक एक्स्पर्ट हे कोडे सोडवून स्वत:ला पारखून घेतात.
- यानंतर 2013 आणि 2014 मध्येही हे कोडे इंटरनेटवर समोर आले. काही जणांचे मानणे आहे की, हे काम CIA चे आहे, जी जगातील सर्वश्रेष्ठ हॅकर्सना एकत्र करू इच्छिते.

 

2015 मध्ये नाही आले कोडे
- असे मानले जाते की, जगभरातील सर्वात श्रेष्ठ कोड ब्रेकर आणि हॅकर्सना शोधण्याची ही युक्ती होती. यादरम्यान 2015 मध्ये हे कोडे समोर आले नाही. अचानक 2016 मध्ये ट्विटरवर एक मेसेज फ्लॅश झाला, Beware false paths. Always verify PGP signature from 7A35090F याचा अर्थ होता की, नकली कोड्यापासून वाचा. सिग्नेचरची तपासणी केल्यावरच पुढे जा. याचा अर्थ असा होता की, काही दुसरे हॅकर्स आणि एजन्सीजही असेच मेसेजेस वापरत होत्या.

 

काय असते या पझलमध्ये? 
- हे पझल आणि कोडे पूर्णपणे डाटा सिक्युरिटी, क्रिप्टोग्राफी आणि स्टेनोग्राफीशी संबंधित होते. त्यांना इंटरनेट इतिहासातील सर्वात जटिल कोडे असल्याचे सांगितले जात होते.

 

मग कोण करत होते हे सर्व?
- इंटरनेट जगतात तशा अनेक गोष्टी सुरू असतात, ज्याबाबत आपल्याला माहिती होत नाही. परंतु हे एक असे कोडे होते, जे सोडवल्यानंतरही गूढच आहे. असे मानले जाते की, यात सीआयए, एनएसए आणि एमआय सिक्स यासारख्या गुप्तचर संस्थांचा हात असू शकतो, ज्या अनेक देशांमध्ये सीक्रेट मिशन चालवतात.

 

अनेक वर्षांपासून सुरू आहे चर्चा
- तसे पाहिले तर याला जगभरातील गुप्तचर संस्थांचा सर्वात बुद्धिमान व्यक्तींना शोधण्याची पद्धत मानले जाते, परंतु सोशल मीडियावर याला अनेक प्रकारे पाहिले जाते. लोक मानतात की, सरकारे गुप्तरीतीने अशा मोहिमा राबवते, ज्या आम जनतेला सांगू इच्छित नाहीत. आणि या गोष्टी फक्त निवडक बुद्धिमान व्यक्तींनाच कळू शकतात.

 

 

बातम्या आणखी आहेत...