आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचंड संतापलेला होता मारेकरी, आधी भोसकला चाकू, नंतर पुरावे मिटवण्यासाठी लावली आग...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली (चंडीगढ)- मोहालीमधल्या इंडस्ट्रिअल फेज-1 येथील फॅक्टरीत मिळालेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले आहे. पोलिसांना गुरूवारी यूपीच्या कुशीनगरच्या राहणाऱ्या 37 वर्षीय नगेंद्र सिंह याचे अर्धे जळालेले शरीर मिळाले होते. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नगेंद्रच्या पोटात हत्यार घुसवल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांना संशय आहे की, नरेंद्रला मारल्यानंतर त्याला जाळण्याचा प्रयत्न केला आहे. मृतदेह पाहून दावा करण्यात येत आहे की, खूनीचा नगेंद्रवर प्रचंड राग होता.

 

- पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून खुलासा झाला की, नगेंद्रच्या पोटाच्या खालील बाजुला मोठी जखम झाली आहे, त्याचे हात आणि पाय जळालेले नाहीतत. आणि आग लागल्यावर त्याच्या पळाल्याचेही काही निशान नाहीत, त्यामुळे ही आत्महत्या नसून खून असल्याचे स्पष्ट झाले आहे.


-पोस्टमार्टम रिपोर्टमधून सगळं स्पष्ट झालं की, नगेंद्रच्या पोटात आधी धारदार शस्त्राने भोसकण्यात आले नंतर त्याया जीव गेल्यावर त्याला जाळण्यात आले. यावरून हे लक्षात येते की, खूनीचा नगेंद्रवरखूप राग होता त्यामुलेच इतक्या निघृणपणे त्याचा खून करण्यात आला. 


- पोलिसांनी अज्ञांत आरोपींविरोधात कलम 302 सोबतच पुरावे नष्ट करण्यासाठी कलम 201 आणि 511 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

- नगेंद्रची पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांना मिळाली आहे आणि पोलिसांच्या सुत्राकडून ही बाब समोर आली आहे की, नगेंद्रच्या पोटाच्या खालील बाजुला एक मोठी जखम आहे. त्या जखमेची लांबी 20 सेमी, रूंदी 15 सेमी आणि खोली 3 सेमी होती. 


- नगेंद्र राजकारणात खुप सक्रिय होता. बलौंगी कॉलोनीच्या पंचायतच्या निवडणुका 30 डिसेंबरला झाल्या होत्या. त्यात एक पंच विजयी झाला होता आणि त्यानंतर त्याने नगेंद्रच्या घराबाहेर ढोल लावून जल्लोष केला होता. त्यावर नगेंद्रने त्याला चप्पल दाखवली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...