आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीनंतर प्रेयसीने 11 वर्ष जुन्या प्रेमकथेची केली पोलखोल, प्रियकर डॉक्टराच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सुरत(गुजरात)- होळीनंतर डॉक्टरच्या 11 वर्ष जुन्या प्रेम कहानीची प्रेयसीने पोलखोल केली. सुरतमधील नावाजलेले पीडियाट्रिशियन डॉ. विपुल मिस्त्रीविरूद्ध प्रेयसीने सयाजीगंज पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेला डॉक्टरकडून तीन वर्षांचा एक मुलगा आहे, शिवाय त्या महिलेचे लग्नदेखील झाले आहे. महिलेचा मुलगा जेव्हा आजारी पडला तेव्हा त्याचा ब्लड ग्रुप टेस्ट केले गेले, जी महिला आणि तिच्या पतीशी मॅच झाली नाही. त्यानंतर महिलेच्या पतीला संशय आला आणि नंतर महिला डॉक्टरांच्या विरोधात उभी राहिली.

 

अशी होती प्रेम कहानी
- भगिनी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. विपुल मिस्त्रीने 2008 मध्ये मेट्रिमोनिअल साइटवर आपले रजिस्ट्रेशन केले होते. याच दरम्यान ते एका युवतीच्या संपर्कात आले. मोबाईलवरून सुरू झालेले संभाषण नंतर मैत्रीत आणि प्रेमात बदलले. 2008 मध्ये त्यांची पहिली भेट झाली.


- जून 2010 मध्ये युवतीचे एका चार्टर्ड एकाउंटंटसोबत लग्न झाले. युवती मुळ मुंबईची राहणारी होती. लग्नानंतर ती मलेशियाला निघून गेली. 2012 मध्ये तिने मुलाला जन्म दिला, याच दरम्यान पतीचे ट्रांस्फर मुंबईला झाले. मुंबईला आल्यावर महिल परत डॉ. विपुलच्या संपर्कात आली आणि त्यानंतर ते दोघे भेटू लागले.


- जुलै 2015 मध्ये महिलेने मुलाला जन्म दिला. 2 वर्षांपूर्वी मुलगा आजारी पडल्यामुले त्याचा ब्लड ग्रुप चेक केला गेला, तो ब्लड ग्रुप कपलसोबत मॅच झाला नाही, त्यानंतर पतीला संशय आला. त्याने मुलाच्या आजारपणाचा खर्च देण्यास नकार दिला. 


- तर तिकडे एका आठवड्यापूर्वी डॉ. विपुलला महिलेला आपली पत्नी म्हणून स्विकार करण्यास सांगतिले. यावर डॉक्टरने नकार दिला आणि त्यामुळेच महिलेने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
 

बातम्या आणखी आहेत...