आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कार\'नामा- पाकिस्तानातील माजी न्यायाधिशांच्या नावावर आहे 2224 कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी न्यायाधिश सिकंदर हयात (वय 82) यांच्या नावावर एक नाही दोन नाही तर तब्बल 2224 गाड्यांची नोंद आहे, हयात यांना जेव्हा हे माहित झाले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. हयात यांच्या वकिलांचा दावा आहे की, त्यांच्या क्लायंटने संपूर्ण आयुष्यात फक्त एक कार खरेदी केली आहे. परंतू पंजाब उत्पादन आणि कर विभागाच्या मते त्यांच्या नावे 2224 गाड्यांची नोंद आहे. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पंजाब उत्पादन आणि कर विभागाचे सचिव आणि निर्देशक यांच्याकडून एका आठवड्यात उत्तर मागितले आहे.


एका पावतीने उघडकीस आणले प्रकरण
हे सर्व प्रकरण उघडकीस आले एका पावतीमुळे. पाकिस्तानच्या अखबार डॉनच्या अहवालानूसार हयात यांच्या घरी एक पावती आली, ती त्यांच्या नावावर नोंद झालेल्या एका गाडीची होती. पावती पाहून त्यांना आश्चर्य झाले की, दुसऱ्याच्या गाडीची पावती त्यांना कशी आली. जेव्हा या प्रकरणावर पंजाब उत्पादन आणि कर विभागाकडून संपूर्ण माहीती मागवली गेली तेव्हा कळाले की, ती गाडी माजी न्यायाधिश सिकंदर हयात यांच्या नावावर आहे. एवढेच नाही तर विभागाने खुलासा केला की, त्यांच्या नावे तब्बल 2224 गाड्यांची नोंद आहे.

 

सरकारी विभागातील अधिकारी या प्रकणात सहभागी 

हे प्रकरण समोर आल्यानंतर आता माजी न्यायाधिश सिकंदर हयात यांच्यासोबत पंजाब उत्पादन आणि कर विभागावर देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कारण, एकाच व्यक्तिच्या नावावर 2224 गाड्यांची नोंद होते आणि विभागाला याची माहीतीच नाही ? खोट्या कागदपत्रांवर एकानंतर एका गाडीची नोंद होत राहिली आणि विभागाला याची भनक देखील लागली नाही. किंवा विभागातील एखादा अधिकारी यात सहभागी असू शकतो.

 

बातम्या आणखी आहेत...