आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस्ट्री : सकाळ होताच यायचा प्रचंड ताप, जेवण करताच गायब.. मुलाच्या जन्मानंतर आजारामुळे झाली अशी अवस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटन - साधारणपणे प्रेग्नंसीदरम्यान महिला लठ्ठपणाच्या बळी पडत असतात. पण या महिला डॉक्टरबरोबर जे काही घडले ते सर्वांसाठी एक कोडे ठरले आहे. इंग्लंडच्या डेवॉन शहरात राहणाऱ्या 20 वर्षांच्या सिनेड टेनरने एका बाळाला जन्म दिला. पण बालाच्या जन्मानंतर त्यांना एक विचित्र प्रकारच्या तापाचा आजार जडला. सकाळ होते तेव्हा त्यांना प्रचंड वेदनादायी ताप येतो आणि सायंकाळपर्यंत तो परत कमी होतो. सिनेड जेवण करताच ताप कमी होतो. 


अचानक 25 किलो वजन घटले 
प्रेग्नंसीनंतर जानेवारी 2017 मध्ये हा प्रकार सुरू झाला. सिनेड यांचे वजन 25 किलोपर्यंत कमी झाले. दिवसातून किमान 20 वेळा त्या उल्टी करायच्या. त्यांना नेमके काय झाले हे डॉक्टरांनाही समजत नव्हते. 


लोकांना वाटले अॅनोरेक्सिया असेल 
सिनेडच्या ओळखीच्या लोकांना असे वाटले की, तिला अॅनोरेक्सिया झाला आहे. हा असा आजार असतो ज्यात व्यक्तीला जेवण करायची भीती वाटते. थोडं खाल्लं तरी जाड होण्याची भीती त्यांना वाटत असते. या मानसिक आजामुळे ती व्यक्ती एवढी घाबरते की जेवण करणे सोडून देते. त्यामुळे वजन प्रचंड कमी होते. पम सिनेडला हा आजार नव्हता. त्यांना नेमके काय झाले हे डॉक्टर शोधत होते. 


मृत्यूच्या जवळ पोहोचली 
सिनेडचे वजन एवढे प्रचंड कमी होत होते, जणू तिचे शरीर गायब होत आहे. जानेवारी 2018 पर्यंत तिची अशी अवस्था झाली की, तिचे अंतर्गत अवयव निकामी होण्याची भीती निर्माण झाले. ती मृत्यूच्या दाढेत पोहोचली होती. तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. दीर्घकाळ तिच्यावर उपचार चालले. तिचे शरीर अन्नच स्वीकारत नव्हते. त्यामुळे इंजेक्शन आणि सप्लिमेंट्सद्वारे तिला जिवंत ठेवण्यात आले. अनेक प्रयत्नानंतर तिचा जीव वाचला. 


जीवन पूर्णपणे बदलले 
आजाराबाबत सिनेड म्हणते की, काय झाले आहे हे मलाच माहिती नाही. मी आधी स्विमर आणि डान्सर होते. आता मला चालायचीही भीती वाटते. मी पार्ट्यांसाठी मित्रांकडेही जात नाही. कारण लोक मला विचित्रपणे पाहतात. कुठे गेलेच आणि काही खाल्ले तर लगेचच टॉयलेटमध्ये पळावे लागते. माझ्या शरिराला जणू अन्नाशी शत्रूत्व निर्माण झाले आहे. 


जिवंत राहण्यासाठी खाते पोटॅशियमच्या गोळ्या 
डॉक्टर अजूनही सिनेडला नेमका काय आजार आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. शरिरात पोटॅशियमची कमतरचा असल्याने तिला बेशुद्धीचे झटके येतात. त्यामुळे जिवंत राहण्यासाठी तिला गोळ्या खाव्या लागत आहेत. सिनेड म्हणाली की, दुसरा दिवस पाहता यावा म्हणून दररोज रात्री मी 13 टॅबलेट खाते. 

बातम्या आणखी आहेत...