आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारळाशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? वाचून थक्क व्हाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, पूजन कर्मामध्ये नारळाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. कोणत्याही देवी-देवताची पूजा नारळाशिवाय अपूर्ण मानली जाते. तुम्हाला मीहिती आहे का? नारळ खाल्याने शारीरिक दुर्बलता कमी होते, तसेच देवाला नारळ अर्पण केल्यास पैशासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात.


> नारळाला श्रीफळ असेही म्हटले जाते. असे मानले जाते की, भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला होता त्यावेळी सोबत तीन गोष्टी आणल्या होत्या. लक्ष्मी, नारळाचे झाड व कामधेनु. यामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष मानले जाते. 
> नारळामध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेश तीनही देवांचा वास मानला गेला आहे. श्रीफळ महादेवाचे परम प्रिय फळ आहे. नारळामध्ये असेलेल्या तीन डोळ्यांना त्रिनेत्र स्वरुपात पहिले जाते.


सन्मानाचे सूचक - 
श्रीफळ शुभ, सुख-समृद्धी, सन्मान, उन्नती आणि सौभाग्याचे सूचक आहे. सन्मान करण्यासाठी श्रीफळ आणि शाल दिले जाते. सामाजिक चाली-रीतींमध्ये नारळ भेट देण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी नारळाची पूजा केली जाते.


नारळाकडून शिकावे - 
नारळाचे आवरण वरून कठीण जरी असले तरी नारळ आतून नरम आणि गोड असते. आपण आपल्या जीवनामध्येही बाहेरून कठोर आणि आतून नरम, मधुर स्वभाव निर्माण करणे आवश्यक आहे.


शास्त्रामध्ये नारळाशी संबंधित विविध परंपरा सांगण्‍यात आल्‍या आहेत. या परंपरेपैकी महिलांनी नारळ फोडू नये अशी एक परंपरा आहे. या परंपरेमागील रहस्य तुम्हाला माहिती आहे का? जर माहिती नसेल तर पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या नारळाशी संबंधित काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...