खरंच माणसांनी स्पर्श / खरंच माणसांनी स्पर्श केल्याने पक्षी पिलांना सोडून देतात, जाणून घ्या सत्य

दिव्य मराठी वेब टीम

Nov 30,2018 01:00:00 PM IST

पक्ष्यांची अंडी किंवा त्यांच्या पिलांना मानवी स्पर्श झाल्यास मोठे पक्षी त्यांना आपल्या घोळक्यात सामील करून घेत नाहीत, असा सर्वसामान्य समज आहे. माणसांनी स्पर्श केल्यास पक्षी त्यांची अंडी तेथेच सोडून निघून जातात, असे म्हटले जाते. पण यात फार तथ्य नाही. संभाव्य धोका लक्षात घेता पक्षी असे करतात. पक्षी शास्त्रज्ञांच्या मते, बहुतांश पक्ष्यांमध्ये (गिधाड, टर्कीव्यतिरिक्त) गंध ग्रंथी नसतात. त्यांना त्यामुळे त्यांना कशाचाच गंध घेता येत नाही. त्यामुळे त्यांना मानवी गंधही कळत नाही. म्हणून माणसांनी स्पर्श केल्यास पक्षी त्यांची पिले सोडून जातात किंवा त्यांना चोचीने मारतात, या म्हणण्यात तथ्य नाही.


ब्रिटिश बर्ड््स लव्हर्स साइटनुसार, एखाद्या व्यक्तीने अंडे उचलून पाहिले आणि ते पुन्हा जागेवर ठेवल्यास त्याची ठेवण बदलते. हे पक्षी ओळखतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला धोका असल्याचे लक्षात येते, तेव्हा ते अंड्यासहित घरटे सोडून जातात. अमेरिकेतील शहरी वन्यजीव योजनेच्या फील्ड डायरेक्टर लॉरा सायमन म्हणतात, पक्षी आपल्या घोळक्यातील सदस्यांना एवढ्या सहजासहजी सोडून देत नाहीत. त्यांच्या जिवाला धोका असल्याचे कळताच ते तत्काळ उडून जातात.


शास्त्रज्ञांच्या मते, घरट्यात बसलेल्या पिलांना आपण स्पर्श केला आणि पिलांच्या आई-वडिलांनी हे पाहिले तर माणसांपासून असलेला धोका ओळखून ते घाबरतात. पण आपण पिलांना उचललेले किंवा त्यांना गोंजारून ठेवून दिलेले मोठ्या पक्ष्यांनी पाहिले नसेल तर पक्षी त्यांना सोडून देत नाहीत.

X
COMMENT