हा पक्षी तुम्हाला / हा पक्षी तुम्हाला काही मिनिटातच बनवू शकतो कोट्याधीश, फक्त करावे लागेल हे एक काम

काही मिनटात तुम्हाला एखादा छोटासा पक्षी कोट्याधीश बनवणार असेल तर तुम्ही काय कराल? जाणून घ्या, या मान्यतेविषयी...

Dec 08,2018 03:39:00 PM IST

सामान्यतः प्रत्येक व्यक्तीची श्रीमंत होण्याची इच्छा असते. परंतु प्रत्येकाची ही इच्छा पूर्ण होईलच असे नाही. परंतु तुम्ही 60 सेकंदात श्रीमंत होऊ शकता असे तुम्हाला समजले तर तुम्ही काय कराल? एवढेच नाही तर काही मिनटात तुम्हाला एखादा छोटासा पक्षी कोट्याधीश बनवणार असेल तर तुम्ही काय कराल? हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु हे सत्य मानले जाते. आज आम्ही तुम्हाला अशा एक पक्ष्याविषयी सांगत आहोत, जो तुम्हाला कोट्याधीश बनवू शकतो.


या पक्ष्याचे नाव टिटहरी असून दिसायला हा अगदी छोटा दिसतो. परंतु हा पक्षी एका वेगळ्याच कारणासाठी फेमस आहे. याची खास गोष्ट म्हणजे, हे कधीही झाडावर घरटे बांधून राहत नाही आणि आपले अंडेही जमिनीवरच देतो. कोणताही इतर पक्षी अंडे दिल्यानंतर त्यावर बसून अंडे उबवतो परंतु टिटहरी पक्षी असे काहीच करत नाही.


टिटहरी पक्षी जमिनीवर वाळूमध्ये अंडे देतो आणि हे अंडे फोडण्यासाठी हा पक्षी पारस दगडाचा वापर करतो. तुम्हाला तर माहितीच असेल की पारस दगडाच्या स्पर्शाने लोखंडाचेही सोने बनते. हा एक रहस्यमयी दगड असून कोणालाही सहजपणे मिळत नाही परंतु टिटहरी पक्षी मात्र या दगड शोधून आणतो.


हा दगड एखाद्याला सापडला तर क्षणातच श्रीमंत होऊ शकतो. परंतु आजपर्यंत पारस दगड कोणालाही मिळालेला नाही आणि यामुळे ही केवळ एक मान्यताच बनून उरली आहे.

X